Tarun Bharat

कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

कुर्ल्यातील नेहरूनगर परिसरात मध्यरात्री एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 8 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर ढिगाऱ्याखाली 12 ते 15 जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, बचावकार्याला वेग आला आहे.

नेहरुनगर परिसरात नाईकनगर सोसायटी नावाची चार मजली इमारत होती. या इमारतीची एक विंग सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफची तुकडी दाखल झाली. एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 8 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. आणखी 12 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस, महापालिकेचे अधिकारी, एनडीआरएफचं पथक आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत. बचावकार्य वेगानं सुरू आहे.

राज्याचे पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सर्व चार मजली धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही लोक तिथे राहतच आहेत. आमचा अग्रक्रम आहे, की सर्वांना वाचवणे, असे आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Stories

सेनेच्या बंडखोर आमदारांचा पुढचा मुक्काम गोव्यात

Archana Banage

शिंदे गटात जाणाऱ्या 12 संभाव्य खासदारांची नावं आली समोर

datta jadhav

मराठा आरक्षण : भाजपाने सत्ता असताना आवश्यक ती पुर्तता केली असती तर आज ही परस्थिती नसती : आ. अरुण लाड

Archana Banage

मुंबईत आजपासून १५ दिवस जमावबंदी

Kalyani Amanagi

नांदणीतील पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

Archana Banage

नाशिकने उठवलेलं वादळ अजून शमलेलं नाही: संजय राऊत

Archana Banage