Tarun Bharat

6 वर्षीय मुलीने केली कमाल

Advertisements

12 हजार फुटांच्या उंचीवर विमानातून घेतली उडी

6 वर्षीय मुलीला धड सायकल चालवता येत नसावी असे मत तयार होणे स्वाभाविक आहे. परंतु 6 वर्षीय मुलगी स्काय डायव्हिंग करू शकते यावर कुणाचाच प्रथमदर्शनी विश्वास बसणार नाही. पण ब्रिटनमधील एका मुलीने इतक्या कमी वयात विमानातून उडी घेत नवा विक्रम केला असून यामुळे ती चर्चेत आली आहे.

इंग्लंडच्या विच चर्च येथे राहणारी 6 वर्षांची लोला जो ब्रॅडशॉ ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची स्काय डायव्हर ठरली आहे. अलिकडेच तिने स्वतःचे स्काय डायव्हिंग कोच अन् 33 वर्षीय पिता गॅरी यांच्यासोबत डेन्मार्कच्या आकाशातून झेप घेतली आहे. लोलाने 12 हजार फुटांच्या उंचीवर उड्डाण करत असलेल्या विमानातून उडी घेतली आहे.

लोलाचे धैर्य नेहमीच वाखाणण्याजोगे राहिले आहे. ती कधीच घाबरत नाही. विमानात अधिक वयाचे लोक होते, जे उडी घेण्यास घाबरत होते, परंतु माझ्या मुलीने न घाबरता विमानातून माझ्यासोबत उडी घेतली. हे स्काय डायव्हिंग डेन्मार्कच्या ड्रॉपझोनमध्ये झाली आहे. लोला 3 वर्षांची असल्यापासून विंड टनेलमध्ये जाण्यास तिने सुरुवात केली होती अशी माहिती गॅरी यांनी दिली आहे.

तिच्या वयात हे सर्व करण्याचा विचार देखील मी करू शकत नव्हतो. माझ्यात तिच्याइतकी हिंमत नव्हती. आम्ही दोघे स्काय डायव्हिंगचे प्रमुख प्रशिक्षक मॅजिक माइकसोबत हे डाइव्ह करण्यासाठी गेलो होतो असे गॅरी यांनी सांगितले आहे.

भारतात प्रयागराज येथे राहणारी 21 वर्षीय अनामिका शर्मा ही सर्वात कमी वयाची लायसन्स्ड स्काय डायव्हर आहे. तिने वयाच्या 11 व्या वर्षी 11 हजार फुटांच्या उंचीवरून पहिले डाइव्ह केले होते. तिच्याकडे एक कॅटेगरीचे प्रोफेशनल युनायटेड स्टेट्स पॅराशूट असोसिएशन्सचे लायसन्स आहे.

Related Stories

घनदाट केसांनी होतेय लाखोंची कमाई

Patil_p

तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यासाठी आणले हेलिकॉप्टर

Patil_p

300 एकर ओसाड जमीन जंगलात रुपांतरित

Amit Kulkarni

जुन्या रुग्णवाहिकांचे सुंदर घरात रुपांतर

Amit Kulkarni

राधानगरी अभयारण्यात ब्लॅक पँथरही? अर्धवट काळा बिबटय़ा कॅमेऱयात कैद

Archana Banage

जगातील अनोखी घरं

Patil_p
error: Content is protected !!