व्यायामाचे डिप्रेशनशी कनेक्शन
जर तुम्ही एका आठवडय़ात 75 मिनिटे देखील चाललात तर डिप्रेशनचे शिकार होण्यापासून वाचू शकता असा निष्कर्ष ब्रिटनच्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीत झालेल्या एका संशोधनातून समोर आला आहे. संशोधनाशी निगडित तज्ञांनुसार जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेल्या व्यायामाच्या कालावधीच्या निम्मा वेळ देखील कसरती केल्यास डिप्रेशनची शक्यता 20 टक्क्यांवर येते.
व्यायामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे रसायन तयार होते, जे आम्हाला आनंदाची अनुभूती मिळवून देते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आठवडय़ात 150 मिनिटांची कसरत आवश्यक आहे. तर कॅम्ब्रिजच्या वैज्ञानिकांनुसार याच्या निम्मा वेळ देखील दिल्यास शारीरिकसाब्sात मानसिक आरोग्यही चांगले राहते. एंडोर्फिन रसायन शरीरात तयार झाल्यावर डिप्रेशनला तोंड देणाऱया लोकांना मदत मिळू शकते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार नैराश्याने ग्रस्त व्यक्तीच्या मानसिकतेही बदल होतो. यामुळे तो सामाजिक हालचालींमध्ये पुन्हा सक्रीय होणे देखील सुरू करतो.
1 लाख 90 हजारांवर संशोधन
हे संशोधन 1 लाख 90 हजार लोकांवर करण्यात आले आहे. यात भारत, अमेरिका, रशिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, जपान समवेत युरोपीय देशांचे लोक सामील होते. अध्ययनात सामील लोकांमध्ये 28 हजार जण नैराश्याला सामोरे जात होते. संशोधन पथकाचे अध्यक्ष डॉ. मॅथ्यू पिअर्स यांच्यानुसार शारीरिक हालचालींमुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. नैराश्याने झोप न येणे, वजन वाढणे, दृष्टी कमजोर होणे, थकवा, कामात मन न लागणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
28 कोटी लोकांना डिप्रेशन
जगात सुमारे 28 कोटी लोक डिप्रेशनला तेंड देत आहेत. यामुळे ते दीर्घकाळापर्यंत निराशेत जगतात. काही अध्ययनांनुसार शारीरिक हालचाली डिप्रेशनला तोंड देण्यास अँटी-डिप्रेसेंट्स औषधांपेक्षा अधिक प्रभावी असतात.