Tarun Bharat

93 वर्षीय महिलेचा साहसी प्रवास

Advertisements

विमानाच्या छतावर उभे राहून प्रवास

आकाशात उडत असलेले विमान आणि त्याच्या छतावर उभी 93 वर्षीय महिला, हे दृश्य ज्या कुणी व्यक्तीने पाहिले असेल त्याला निश्चितच धक्का बसला असणार. सोशल मीडियावर या महिलेचा अचंबित करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिला उड्डाण करणाऱया विमानाच्या छतावर उभी असल्याचे दिसून येते.

अशाप्रकारची कामगिरी करण्याची 93 वर्षीय बेट्टी ब्रोमेज यांची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी 4 वेळा त्यांनी असे करू दाखविले आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱया ब्रोमेज यांनी अलिकडेच हाय-फ्लाइंग चॅलेंज अंतर्गत विंग वॉकर म्हणून स्वतःचे पाचवे उड्डाण पूर्ण केले आहे. त्यांच्या या व्हिडिओला हजारो ह्यूज मिळाले आहेत.

विमान आकाशात झेपावल्यानंतर काही मिनिटांनी लँड झाले होते. वेगवान वाऱयांदरम्यान ब्रोमेज यांनी स्वतःला सांभाळले होते. परंतु यादरम्यान त्यांनी सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले होते. हा उत्तम अनुभव होता आणि याचा मी आनंद लुटला असल्याचे बेट्टी यांनी म्हटले आहे. तर विमानाचे वैमानिक ब्रायन कॉर्न्स यांनी मी का ब्रोमेज अधिक कोण घाबरले होते हे मला माहीत नसल्याचे उद्गार काढले आहेत. ब्रोमेज एक अद्भूत महिला असल्याचे त्यांचे सांगणे आहे. अनेक शारीरिक अडचणींनंतरही ब्रोमेज यांनी ही कामगिरी चॅरिटीसाठी निधी जमविण्याकरता केली आहे

Related Stories

ColdZyme 20 मिनिटांत करणार 98.3 टक्के कोरोना विषाणू नष्ट

datta jadhav

अमेरिकेकडून मिळणार सर्वात घातक तोफ

Patil_p

दुती चंदचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

datta jadhav

पेरुला बसला भुकंपाचा धक्का 41 जण जखमी

Patil_p

हाफिज सईदला 10 वर्षांचा तुरुंगवास

datta jadhav

…तरच निवडणुकीचा निकाल मान्य करणार

datta jadhav
error: Content is protected !!