प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील फुटपाथवर मृतावस्थेत आढळलेल्या एका दारूडय़ा भिकाऱयाचा खून झाल्याचे उघडकीस आले. मयताचे नाव रमेश चौहान असे आहे. या प्रकरणी चौकशीअंती पोलिसांनी पृथ्वी चौहान या 19 वर्षीय युवकाला अटक केली आहे. अवघ्या काही तासांच्या आत तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
अधिक माहितीनुसार काल शुक्रवारी सकाळी शहरातील हॉटेल अन्नापूर्णाजवळील फुटपाथवर एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय चिकित्सेसाठी पाठवून दिला. पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गीक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र शवचिकित्सा अहवालात सदरचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने खूनाचा संशय बळावला. पोलिसांनी चौकशी हाती घेतली असता खारवीवाडा वास्को येथे राहणाऱया पृथ्वी चौहान या युवकाने मयताला दांडय़ाने मारहाण केली होती अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे पोलिसांनी त्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता काही तासांच्या आत तो पोलिसांच्या हाती लागला. मृतदेह आढळून आलेल्या त्या फुटपाथजवळच संशयीत आरोपी व मयतामध्ये सकाळी साडे पाचच्या सुमारास वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात संशयीताने मयताला दांडय़ाने मारहाणे केली होती. संशयीताने खुनाची कबुली दिलेली असून त्याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा नोंद करून पोलिसांना त्याला अटक केली आहे.
मयत भिक मागणारा तसेच कधीकधी रेल्वे स्थानकाजवळील एका गाडय़ावर कामही करीत होता. तसेच तो दारूच्या आहारी गेलेला होता. ही खुनाची घटना घडलेल्या ठिकाणाजवळ एक बार असून त्या ठिकाणी संशयीत बियरची बोटल खरीदण्यासाठी आला होता तर मयत दारू पिण्यासाठी आला होता अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या खून प्रकरणी पोलीस निरीक्षक कपिल नायक अधिक तपास करीत आहेत.