क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिलांच्या ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी गोवा विद्यापीठाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजन 8 ते 12 जानेवारी या कालावधीत जालंधरातील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात होईल.
या स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व रुचा शेट, तनिष्का शिवोलकर, नेहा नाईक, निकल मयेकर, ज्योती यादव व इराम खत्री या करतील. ज्युडोपटूंना क्रिट्सचे वितरण गोवा विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी बाळाचंद्र जडार, डॉ. शैलेंद्र गावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संघासमवेत रिया गावडे या प्रशिक्षिका तर देवराज हिरेकुरबार हे व्यवस्थापक म्हणून जातील.