Tarun Bharat

शिंदे गटाला मोठा धक्का; अजय चौधरीच सेनेचे गटनेते

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पहिला झटका बसला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांना मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Sitaram Zirwal, Deputy Speaker of Maharashtra) यांनी ही मान्यता दिली आहे. विशेष बाब म्हणजे याच गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेला हा दावा मान्य करण्यात आला नाही. नियमानुसार आता शिवसेना गटनेता पदावर अजय चौधरी यांनाच मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची नोंद विधिमंडळात झाली असल्याचं समजतंय. शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता शिंदे गट काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान शिवसेनेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे टायमिंगची चर्चा पुन्हा रंगली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये शिंदे म्हणतात, आम्ही बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची (Hindutva) शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा उल्लेख नसल्याने एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisements

Related Stories

शहरातल्या भटक्या कुत्र्यांचे होणार आता निरबीजिकरण

Patil_p

कोंढवा खुर्द मिठानगर येथील कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Rohan_P

कुस्तीगिरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – दिपाली सय्यद

Sumit Tambekar

सुर्लीत जस्साच्या ‘पुट्टीवर’ सुदेशकुमार चितपट

Patil_p

”महाराष्ट्राचे वाटोळे झाल्यानंतर पवारसाहेबांची नाराजी”

Abhijeet Shinde

वाई बंदच्या अफवांचे पेव

Patil_p
error: Content is protected !!