साईराज चषक फुटबॉल : जगजंपी बजाजकडून बक्षिसाची योजना
बेळगाव : साईराज स्पोर्टस क्लब आयोजित 11 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय फुटबॉलस्पर्धेत प्रथमच मालिकावीरासाठी जगजंपी बजाजतर्फे दुचाकी वाहनांची बक्षीस देण्यात येण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. साईराज स्पोर्टस क्लबतर्फे साईराज स्पोर्टस क्लब व महेश फगरे यांच्या पुढाकाराने 21 नोव्हेंबर पासून टिळकवाडी येथील लेले मैदानावरती 11 व्या निमंत्रीतांच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार असून या स्पर्धेत केरळ, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गोवा, हैद्राबाद येथून संघाना निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या फुटबॉलमध्ये प्रथमच बेळगावात मालीकावीरासाठी दुचाकी वाहनाचे बक्षिस देण्यात येणार आहे. हे बक्षिस मल्लिकार्जुन जगजंपी बजाज पल्सर दुचाकी वाहन देण्यात येणार आहे. यापूर्वीही महेश फगरे यांच्या प्रयत्नामुळे मल्लिकार्जुन जगजंपी यानी साईराज चषक क्रिकेट स्पर्धेतील मालीकावीरासाठी दुचाकी वाहन देण्यात आले आहे. बेळगावात अनेक फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. अनेक खेळाडूंना रोख रक्कम व चषक अशी बक्षिसे देण्यात आले. पण यावर्षीच्या फुटबॉल स्पर्धेत प्रथमच मालीकावीरासाठी दुचाकी वाहनाचे बक्षिस देण्यात येणार आहे. यावेळी एका कार्यक्रमात साईराज स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष महेश फगरे, स्पर्धा सचिव आनंद चव्हाण, विजय रेडेकर, अमरदिप पाटील, यांच्या उपस्थितीत जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी वीरेश मलाबादी, वेंकटेश नायक, अमित तांजी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन जगजंपी म्हणाले साईराज स्पोर्टसतर्फे क्रिकेट व फुटबॉल स्पर्धा भरविल्या जात आहेत. त्या स्पर्धेसांठी जगजंपी बजाजकडून दुचाकींचे बक्षिसे देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.