Tarun Bharat

विरोधी पक्षांच्या एकतेला झटका

Advertisements

भाजप विरोधी आघाडीत सामील होणार नाही टीआरएस

वृत्तसंस्था / हैदराबाद

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिगरकाँग्रेस आणि बिगरभाजप पक्षांची राजकीय आघाडी निर्माण करण्याच्या मताचे आपण नसल्याचे तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. सध्या राजकीय आघाडीऐवजी देशाला टीआरएसच्या धर्तीवर एक पर्यायी अजेंडय़ाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. केसीआर यांची नवी भूमिका पाहता ते कुठल्याच आघाडीत सामील न होता स्वतःच्या पक्षाचे राजकीय बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मानले जात आहे. यामुळे प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याच्या काही नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला तडा जाणार आहे.

डाव्या पक्षांनी अलिकडेच माझी भेट घेत केंद्रातून भाजपला हटविण्यासाठी एकजूट प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता. पंतप्रधानांना हटविण्याचा आणि नव्या पंतप्रधानाला नेमण्याचा विचार चुकीचा असल्याची भूमिका स्पष्टपणे त्याच्यासमोर मांडली. अखेरीस लोकशाहीचा विजय व्हावा हाच माझा विचार असल्याचे केसीआर यांनी म्हटले आहे.

मागील काही महिन्यांमध्ये त्यांनी सातत्याने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाणारे केसीआर यांचे हे नवे विधान आहे. 11 एप्रिल रोजी त्यांनी दिल्लीमध्ये धरणे आंदोलन करत केंद्र सरकारला लक्ष्य केले होते. टीआरएस एक प्रादेशिक पक्ष असल्याने त्याला राष्ट्रीय स्तरावरील पक्षात  रुपांतरित करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. टीआरएसचे नाव बदलून ‘भारतीय राष्ट्र समिती’ करण्याचाही सल्ला मिळाला होता असे त्यांनी आता म्हटले आहे. हैदराबादमधून देशाची दिशा बदलणार असल्यास तेलंगणाच्या लोकांसाठी हा गर्वाचा क्षण असणार आहे. टीआरएस पर्यायी अजेंडा तयार करण्यात आणि देशाला नवी दिशा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पर्यायी शक्ती लवकरच उभी राहून एक राजकीय वादळ निर्माण करणार असल्याचा दावा केसीआर यांनी केला आहे.

Related Stories

‘बिग बॉस’चीही आर्थिक तंगी

Patil_p

‘सप’चा बालेकिल्ला भेदण्याची भाजपची तयारी

Patil_p

PM मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट, अलर्ट जारी

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये 8 जणांना जिवंत जाळले

Patil_p

राज्यांनी पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅट कमी करावा

datta jadhav

महिपाल मदेरणा यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!