Tarun Bharat

जमिनीवरून झाडलेली गोळी घुसली विमानात

Advertisements

विमानातील प्रवासी जखमी ः म्यानमारमधील घटना

वृत्तसंस्था / यंगून

म्यानमारमध्ये एक चकीत करणारी घटना घडली आहे. येथे जमिनीवरून झाडण्यात आलेली गोळी थेट आकाशातून उड्डाण करत असलेल्या विमानातील प्रवाशाला  लागली आहे. हा व्यक्ती म्यानमार नॅशनल एअरलाइन्सच्या विमानातून प्रवास कर होता. या घटनेवेळी विमान 3500 फुटांच्या उंचीवरून उड्डाण करत होते.

या घटनेनंतर विमानाचे लँडिंग करवून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित प्रवाशाच्या मानेजवळ गोळी लागली आहे. या घटनेशी निगडित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

म्यानमार नॅशनल एअरलाइन्सच्या या विमानातून 63 जण प्रवास करत होते. काया प्रांताची राजधानी लोइकावच्या दिशेने हे विमान जात होते. अन्य प्रवाशांना कुठलीच ईजा झालेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव लोइकाव येथील विमानसेवा रोखण्यात आली असल्याची माहिती म्यानमार नॅशनल एअरलाइन्सच्या एका अधिकाऱयाने दिली आहे.

बंडखोर गटांनी विमानावर गोळीबार केल्याचा आरोप म्यानमारमधील सैन्य राजवटीने केला आहे. तर बंडखोर गटांनी हा आरोप नाकारला आहे. म्यानमार मिलिट्री कौन्सिलचे प्रवक्ते मेजर जनरल जॉ मिन टुन यांनी या हल्ल्याला युद्धगुन्हा संबोधिले आहे. प्रवाशांनी भरलेल्या विमानावर अशा प्रकारचा हल्ला हा युद्धगुन्हा आहे. शांततेचे पुरस्कर्ते असणाऱया लोकांनी या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवावा असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

ब्रिटनमध्ये खलिस्तानी टीव्हीवर कारवाई

Patil_p

इराणमध्ये कोरोनाची तिसरी लाट; 32 प्रांत रेड झोनमध्ये

datta jadhav

अमेरिकेत नव्या कायद्याला मंजुरी

datta jadhav

कोरोनाचा नवा स्ट्रेन पोहचला 16 देशात

datta jadhav

दुबईत महात्मा गांधींना अनोखी आदरांजली

datta jadhav

भारतात गुंतवणूक न कराल, तर संधी गमावाल

Patil_p
error: Content is protected !!