Tarun Bharat

सोशल मीडिया सेलिब्रिटी बॉबी कटारियाला दणका

रस्त्यावर मद्यप्राशन केल्याबद्दल अजामीनपात्र वॉरंट जारी

डेहराडून / वृत्तसंस्था

सोशल मीडिया सेलिब्रिटी बॉबी कटारियाला उत्तराखंड पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे. येथील जिल्हा न्यायालयाने बॉबीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. डेहराडूनमध्ये रस्त्यावरील वाहतूक थांबवून मद्यप्राशन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. याचदरम्यान पोलिसांना धमकावल्याचा आरोपही बॉबीवर करण्यात आला आहे. बॉबी मूळचा हरियाणातील गुरुग्राम येथील असून सोशल मीडियावर त्याचे 6.30 लाख फॉलोअर्स आहेत.

बॉबीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक हरियाणा आणि लगतच्या राज्यांमध्ये पाठवण्यात आले आल्याची माहिती डेहराडून पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सिंह रावत यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यापूर्वी यूटय़ूबर बॉबी कटारिया याच्यावर स्पाईसजेटच्या विमानात धुम्रपान केल्याचा आरोपही झाला होता. एअरलाईन्सने जानेवारीमध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत त्याला पुढील 15 दिवसांसाठी फ्लाईटमध्ये प्रवास करण्यास मनाई केली होती.

Related Stories

भविष्यातील आरोग्य व्यवस्थापनात आयुर्वेदाला महत्वाचे स्थान : श्रीपाद नाईक

Tousif Mujawar

छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक

Patil_p

पंजाबच्या ‘कॅप्टन’चा राजीनामा

Patil_p

सेन्सेक्स पुन्हा घसरणीसह बंद

Patil_p

कोरोनाचा कहर : पंजाबमध्ये उच्चांकी रुग्ण संख्या

Tousif Mujawar

विकास दुबेच्या साथीदाराला चकमकीत कंठस्नान

Patil_p