Tarun Bharat

गोकुळ शिरगाव येथील उद्योजकाची गळफास घेवून आत्महत्या

गोकुळ शिरगाव वार्ताहर

गोकुळ शिरगाव येथे फर्निचरचा व्यवसाय करणारे प्रदीप राजाराम सासणे (वय 36) रा. तामगाव तालुका करवीर यांनी गुरुवार दि.1 रोजी सकाळी राहत्या घराशेजारी दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

गळफास लावल्याची घटना उघडकिस येताच त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल केले होते. पण यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. प्रदीप सासणे यांचा तिघांच्या भागीदारीमध्ये गोकुळ शिरगाव येथे फर्निचरचा कारखाना आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी यांची भागीदारी संपुष्टात आली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद डॉक्टर नवज्योत वैद्यकीय अधिकारी सिपीआर यांनी दिली आहे .या घटनेचा तपास सहायक फौजदार खोत व पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.

Related Stories

आठ डिसेंबरच्या भारत बंदला मलकापूर व्यापारी बांधवांचा पाठिंबा

Archana Banage

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती तात्काळ सुरु करा

Archana Banage

गोकुळचा आणखी एक ठरावधारक कोरोनाचा बळी

Archana Banage

आजरा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय

Archana Banage

महायुतीत रयत क्रांतीचा बंडाचा झेंडा

Archana Banage

कोल्हापूर : आपट्याच्या पानावर साकारले श्री अंबाबाईचे चित्र

Archana Banage