प्रतिनिधी / किणये : राकेसकोप जवळील पुलाजवळ तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रक नाल्यात कोसळला. सोनोलीचा दिघ्नेश भरमा झंगरुचे ( वय 17 ) हा तरुण ठार झाला.
हा अपघात सोमवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान झाला. सोनोली-राकसकोप परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. पुलाजवळ बसलेल्या तरुणाला ट्रकने धडक दिल्यामुळे ट्रकसह तरुण नाल्यात पडला.