शिवतेज हॉटेलमध्ये केली होता हत्यारानिशी नंगानाच
प्रतिनिधी/ सातारा
शांत बनू पाहत असलेल्या खेड परिसरात गुंड दत्ता जाधव याच्या दुसऱया पोराची दहशत वाढू लागली आहे. त्याच्या टोळीने चक्क हातात प्राणघातक शस्त्रs नाचवत हॉटेल शिवतेजमध्ये नंगानाच घातला. तेथील कर्मचाऱयांना मारहाण करुन दहशत निर्माण केली. हॉटेल मालकास शिवीगाळ करत हॉटेलची तोडफोड केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अद्याप सातारा शहर पोलिसांनी त्या टोळीच्या मुसक्या आवळल्या नसल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, त्या टोळीने अनेक ठिकाणी अनेक कारनामे केल्याची जोरदार चर्चा खेड, प्रतापसिंहनगर, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सुरु आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतापसिंहनगर येथील आकाश दत्तात्रय जाधव याच्या टोळीची गुडगिरी वाढू लागली आहे. तो गुड दत्ता जाधव याचा दुसरा पोरगा आहे. त्याच्या टोळीने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील फळ विक्रेत्यांचे नुकसान केल्याच्या घटनेनंतर त्याचे कारनामे बाहेर पडू लागले आहेत. त्याच्या टोळीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. 8 रोजी 9.22 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉ. विशाल किसन धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शिवतेज हॉटेलमध्ये दि. 6 रोजी रात्री 11.30 वाजता आकाश जाधव व त्याच्या टोळीतील सुनील वाघमारे, रोहित वाघमारे, अजय खवळे, अप्पा भवाळ, अमर भवाळ, शुभम कांबळे उर्फ जगीरा, बारक्या काब्ंाळे (सर्व रा. प्रतापसिंहनगर) यांनी बिलाच्या कारणावरुन हॉटेलमधील कर्मचाऱयांना दमदाटी, शिवीगाळ करत प्राणघातक हत्यारानिशी हॉटेलमध्ये शिरुन हॉटेल मालक अमोल नलावडे यांना धक्काबुक्की केली. त्या टोळीने कॅश काऊटर आणि खिडकीच्या काचा फोडून दहशत माजवली. त्यांच्या हातात धारधार शस्त्रs होती. त्यामुळे सर्व वातावरण भयभित झाले होते. याचा तपास पोलीस नाईक यादव करत आहेत. शहर पोलीस ठाण्यात सलग दोन दिवसात त्या टोळीवर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. अद्यापही या टोळीकडून अनेक गुन्हे या परिसरात घडलेले आहेत. त्याची नोंद पोलीस दप्तरी झाली नसून शहर पोलिसांनी त्या टोळीच्या मुसक्या आवळल्या नसल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत सवाल उपस्थित होवू लागला आहे.
मोक्काच्या प्रस्तावाचे तेवढे बघा
ही टोळी खूप खतरनाक आहे. आधी जेथे हप्ता मागायचा आहे तेथील हॉटेल, फळ विक्री करणाऱया दुकानात जावून ऑर्डर करते. खा खा खाल्यावर बिल देत नाही. तूच आमचे पैसे दे म्हणून दमदाटी करु लागतात. जरा जरी बोलण्यात अरेतुरे झाले की डायरेक्ट फोडाफोडी आणि कॅश काऊंटरकडे या टोळीचा हात जातो. सोबत आणलेल्या वाहनांमधून हत्यारे आणलेली असतात. जास्त दंगा व्हायला लागला की हत्यारे काढून दहशत माजवतात. तेथील मालाची नासधुस करतात, असा सपाटा दिवसा आणि रात्रीही सुरु आहे. महिला वर्गांच्याबाबतीत सुद्धा अनेक घटना या टोळीकडून घडल्या आहेत, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सातारा शहर पोलिसांनी तात्काळ या टोळीला मोक्काचा प्रस्ताव करुन बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
जगिऱया आणि बारक्या उजवा डावा हात
दत्ता जाधव याच्या दुसऱया पोराचा डावा आणि उजवा हात म्हणून जगिऱया आणि बारक्याची ओळख आहे. प्रतापसिंहनगरात जगिऱया आणि बारक्या हे खूपच फेमसं आहेत. त्यांच एकच सुत्रं आपलाच इलाखा सारा. आपणच वाजवतो साऱयाची गेम, आपला नाही चुकत नेम, असे असून नगराचे नाव पुन्हा खराब होवू लागले असल्याच्या चर्चा सुरु आहेत.