Tarun Bharat

डुप्लिकेट मुख्यमंत्री विजय माने याच्यावर गुन्हा दाखल

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तोतयावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विजय नंदकुमार माने  (रा. आंबेगाव, पुणे) असे तोतयागिरी करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत खंडणी व पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर आयपीसी 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा  दाखल केला आहे. 

फिर्यादी हे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि.19) पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा व पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तसेच समाजमाध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपण आहोत, अशी तोतयागिरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सॲप व फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेत असताना पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. आरोपी विजय माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा व पोशाख परिधान करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत होता.आरोपीने जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.

Related Stories

मराठा आरक्षणासंदर्भात भोसले समितीच्या अहवालावर तात्काळ कार्यवाही करा – देवेंद्र फडणवीस

Archana Banage

मोहसीन शेख हत्या प्रकरण : हिंदू राष्ट्रसेनेच्या अध्यक्षासह 20 जणांची निर्दोष मुक्तता

datta jadhav

दहावी-बारावी परीक्षेतील गैरप्रकारात घट

datta jadhav

उंदरगाव बलात्कार प्रकरणी मनोहर भोसले यास सात दिवसांची पोलिस कोठडी

Archana Banage

धर्मांध शक्तींला बाजूला ठेवा-शरद पवार

Archana Banage

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचा २६ वर्षांचा प्रवास

Archana Banage