Tarun Bharat

Satara : रेशनचे धान्य विकल्याप्रकरणी रेशन दुकानादारासह तिघांवर गुन्हा दाखल

युवकांनी रोखला रेशनचा काळाबाजार; भाटमरळी येथील घटना

Advertisements

नागठाणे- प्रतिनिधी

रेशनच्या लाभार्थी ग्राहकांसाठी आलेला तांदूळ खाजगी व्यापारी विकत घेऊन जात असताना भाटमरळी (ता सातारा) येथील युवकांनी रंगेहाथ पकडला. युवकांनी धान्यासह संबंधित व्यापाऱ्याला बोरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी येथील रेशन दुकानादारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची फिर्याद पुरवठा निरीक्षक संतोष बळीराम दळवी यांनी रविवारी रात्री बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार भाटमरळी येथील काही युवकांनी प्लेझर मोपेड या दुचाकीवरून तांदळाची पोती घेऊन जाणाऱ्या कृष्णनाथ नारायण तपासे या खाजगी व्यापाऱ्याला रविवारी दुपारी पकडले. त्याच्याकडे असलेल्या धान्याविषयी विचारणा केली असता ती संबंधिताने गावातीलच स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदार वामन जगन्नाथ बल्लाळ व त्याचा पुतण्या मधुकर भगवान बल्लाळ यांच्या कडून खरेदी केले असल्याचे सांगितले. रेशन दुकानदार वामन बल्लाळ व त्यांचा पुतण्या मधुकर बल्लाळ यांनी रेशन लाभार्थ्यांकरीता वितरणासाठी दिलेल्या तांदळाच्या पोत्यांपैकी सहा पोती तांदूळ लाभार्थ्यांना न वाटता बेकायदेशीरपणे खाजगी व्यापाऱ्यास विकल्याचे निदर्शनास आल्यानंतर युवकांनी याची माहिती पुरवठा विभागाला दिली व खाजगी व्यापारी व तांदळाच्या पोत्यांसह त्यांनी बोरगाव पोलीस ठाणे गाठले.

सायंकाळी पुरवठा विभागाचे संतोष बळीराम दळवी हे वरीष्ठ अधिकाऱ्यांसह बोरगाव पोलीस ठाण्यात आले. त्यांनी या घटनेची शहानिशा केल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्यात रेशन दुकानदार वामन जगन्नाथ बल्लाळ, त्याचा पुतण्या मधुकर भगवान बल्लाळ(रा. भाटमरळी, ता.सातारा) व खाजगी व्यापारी कृष्णनाथ नारायण तपासे (रा. मल्हारपेठ,सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.पुरवठा निरीक्षकांनी ६ पोती तांदूळ व पोलिसांनी दुचाकी असा ३२ हजार रुपये किमतीचा।मुद्देमाल ताब्यात घेतला असून कृष्णनाथ नारायण तपासे याला अटक केली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक सुनील ढाणे करीत आहेत.

Related Stories

लोणंद – शिरवळ रोडवरील अपघातात ग्रामविकास अधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांचा मृत्यू

Amit Kulkarni

दलित समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन

Patil_p

आकाशात 22 हजार फुटांवर फडकला तिरंगा

Patil_p

साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला माजी सरपंचाची बेदम मारहाण

datta jadhav

सातारा : 485.90 कोटींच्या जिल्हा नियोजनाचा प्रारुप आराखडा मंजूर

datta jadhav

सातारा : वाढेचे उपसरपंच भरवणार अनोखी स्पर्धा

Archana Banage
error: Content is protected !!