चिपळूण/प्रतिनिधी
शहर परिसरातील वाणीआळीत जागेच्या बनावट सातबारा प्रकरणी येथील तलाठ्यासह तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित नेताजी राठोड (तलाठी, चिपळूण तहसील कार्यालय), अजित तुकाराम घोरपडे व मुरलीधर अनंत घोरपडे (दोघे-पवारआळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद कल्पेश सुधाकर खातू (वाणी आळी, चिपळूण) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, 6 ऑक्टोबर 2018 ते 1 जानेवारी 2021 या कालावधीत अजित राठोड याने त्याच्या तलाठीपदाचा गैरवापर करुन अप्पर तहसीलदारांनी निर्गमीत केलेल्या उपरोक्त आदेशामध्ये राठोडसह अजित घोरपडे, मुरलीधर घोरपडे यांनी संगनमताने बनावटीकरण करुन चुकीचा सातबारा शासकीय अभिलेखावर तयार केला. तसेच कल्पेश खातू यांचे आर्थिक नुकसान करत धमकी दिली. याप्रकरणी त्या तिघांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.