Tarun Bharat

ओपनस्पेसवर अतिक्रमणाचा विळखा

हापालिकेच्या दुर्लक्षाचा परिणाम, आरक्षित जागांवरही डल्ला, ओपनस्पेसवर टोलजंग इमारती, झोपडपट्टींचा कब्जा : मनपाच्या उद्देशालाच हारताळ

विनोद सावंत/कोल्हापूर

शहरातील ओपनस्पेस आणि आरक्षित जागांवर अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ओपनस्पेसवर टोलजंग इमारती आणि झोपडपट्टींनी कब्जा घेतला आहे. वेळीच महापालिकेचे नाव लागले नसल्यामुळे तसेच कारवाईकडे कानाडोळा केल्यामुळे मनपाचे हक्काचे भुखंड धोक्यात आले आहेत.

शहरात महापालिकेच्या दोन हजारहुन अधिक ओपनस्पेस आहेत. 2007 पासून पुढे जे ले आऊट झाले. तेथील ओपनस्पेसवर महापालिकेचे नाव लागले आहे. मात्र, 2007 पूर्वी जे ले आऊट मंजूर करून ओपनस्पेस केले आहेत. त्यांच्यातील 40 टक्के ओपनस्पेसवर मनपाचे नावच लागलेले नाही. अशा ओपनस्पेसवर अनेकांनी डल्ला मारला आहे. यामध्ये काही शेजारील मिळकतधारकाने अतिक्रमण करून ओपनस्पेस बळकविलेत, मंडळांनी मंडप उभारलीत तर काही जागांवर बेसुमार झोपडय़ा झाल्या आहेत. शिवाजी पार्क येथील आग लागलेली झोपडपट्टीही त्यापैकी एक आहे. सुरवातील हाताच्या बोटावर मोजण्याऐवढया येथे झोपडया होत्या. परंतू एकामागून एक झोपडय़ा वाढत गेल्या. असाच प्रकार इतरही ओपनस्पेसवरील आणि आरक्षित जागांवर अतिक्रमण झाले आहे. याला केवळ मनपा जबाबदार आहे, असा भाग नाही. मतांचे गणित असल्याने लोकप्रतिनिधींकडूनही दबाव टाकून मनपाच्या कारवाईत अडकाटी आणल्यामुळेही अतिक्रमणाला बळ मिळत गेले, हे वास्तव आहे.

शहरात एकूण ओपन स्पेसची संख्या -सुमारे 2500
मनपाकडे ओपनस्पेसची नोंद-1600
मनपाचे नावे नसणारे ओपन स्पेस -सुमारे 1 हजार


कॅम्प घेवून मनपाचे नाव लावा
ओपनस्पेस घशात घातले जात असल्याने प्रशासनाशी पाठपुरावा करून 473 ओपनस्पेसवर महापालिकेचे नाव लावून त्यांचा डाव हाणून पाडला आहे. अद्यपही शहरातील एक हजारहुन अधिक ओपनस्पेसवर मनपाचे नाव चढलेले नाही. तहसीलदार, सिटी सर्व्हे, नगरचना कार्यालय यांचा संयुक्त कॅम्प घेवून मनपाचे तत्काळ नाव लावल्यास या सर्व गोष्टींना अळा बसेल. – भुपाल शेटे, माजी उपमहापौर

उद्देशालाच हारताळ
सार्वजाणिक हिताच्या उद्देशाने लेऊट करताना एकूण भुखंडाच्या 10 टक्के जागा ओपनस्पेस ठेवली जाते. या जागेत सांस्कृतिक हॉल, उद्यान, विरंगुळा केंद्र, ओपनजीम करण्यासाठी याचा वापर करणे अपेक्षित आहे. परंतू 40 ते 50 टक्के ओपनस्पेसचा गैरवापर होत आहे.

ओपनस्पेसच्या ठिकाणी फलक लावण्याची गरज
ओपनस्पेस म्हणून भुखंड निश्चित केल्यानंतर त्याची खरेदी विक्री करता येत नाही. मात्र, काहींनी ओपनस्पेसचे भुखंडाची विक्री केल्याचे प्रकारही यापूर्वी समोर आले आहेत. यामध्ये खरेदीदाराची फसवणुक होत आहे. तसेच मुळ मालकांनी अशा भुखंडावर बँकेतून कर्जही उचलली जात आहे. मनपाची नाव ओपनस्पेसवर चढले नसल्याचा पद्धतशीर फायदा घेतला जात आहे. यासाठी मनपाने तत्काळा ओपनस्पेसच्या ठिकाणी ‘ही जागा ओपनस्पेस’ असल्याचे फलक लावणे गरजेचे आहे.

महापालिकेचा हलगर्जीपणा
ओपनस्पेस जागेवर झोपडपट्टीसह बांधकाम करून अतिक्रमण होत असतानाही महापालिका कारवाई करत नाही. सुरवातीलाच मनपाने संबंधितांवर कारवाई केली तर ओपनस्पेस सुरक्षित राहणे शक्य आहे. अन्यथा भुखंड कोणाच्या तरी घशात जाणार यात शंका नाही.

परिसरातील मिळकतधारकांवर पश्चातापाची वेळ
शिवाजी पार्क येथे ओपन स्पेस असल्याचे पाहून येथे कोटय़ावधीला जागा घेतल्या. मात्र, ओपनस्पेसवरच झोपडय़ा थाटल्याने त्यांनाही आता पश्चात करण्याची वेळ आली आहे.

Related Stories

किणी टोल नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे पोलीस प्रमुखांनी केले कौतुक

Archana Banage

राजू शेट्टींना उपचारासाठी पुण्यात केले दाखल

Archana Banage

भिमगीतातून डॉ. आंबेडकरांना सलाम

Abhijeet Khandekar

चित्रपट महामंडळाच्या निवडणूक वादावर धर्मादाय आयुक्तांचे आदेश, अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणूक तारखा होणार रद्द

Archana Banage

कोल्हापूर : तावडे हॉटेल मुख्य प्रवेशद्वार रस्त्यावर, शिवसेनेचे आगळे आंदोलन

Archana Banage

कोल्हापूर : दुसऱ्या दिवशीही एकही कोरोना मृत्यू नाही

Archana Banage