चेन्नई
सीबीआयने माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. तपास यंत्रणेनुसार राजा यांनी केंद्रीय मंत्री असताना 5.53 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती मिळविली आहे. चेन्नईच्या विशेष सीबीआय न्यायालयात दाखल आरोपपत्रात राजा यांचे निकटवर्तीय सी. कृष्णमूर्ती यांनी जानेवारी 2007 मध्ये एक कंपनी स्थापन केली होती. याच कंपनीला फेब्रुवारी 2007 मध्ये 4.56 कोटी रुपये देण्यात आले होते. ही रक्कम एका रियल इस्टेट कंपनीकडून कांचीपुरम येथील भूखंड खरेदीसाठी कमिशन म्हणून देण्यात आली होती. राजा यांनी ही रक्कम भूखंड खरेदीसाठी नव्हे तर रियल इस्टेट कंपनीला एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा दर्जा मिळवून देण्यासाठी दिली होता असा आरोप आहे.