प्रत्येक सजीवाला आपण जन्माला घातलेल्या अपत्यांचे अनन्यसाधारण प्रेम असते. आपली नवजात अपत्ये जगावीत, सुरक्षित रहावीत आणि मोठी व्हावीत ही इच्छा सार्वत्रिक आहे. कित्येकदा मुके प्राणी आपला जीव धोक्मयात घालून आपल्या अपत्यांचे रक्षण करतात. सध्या एका कोंबडीचा असाच व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला असंख्य लाईक्स मिळालेले आहेत. या कोंबडीचा आदर्श मानवाने घ्यावा, अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.
मोठय़ा पावसात या कोंबडीची नुकतीच अंडय़ातून बाहेर पडलेली पिले भिजत आहेत. त्यांचा जीव वाचविण्यासाठी ही कोंबडी आपले पंख पसरून त्यांना पाऊस लागू नये, असा प्रयत्न करत आहे, असे या व्हिडिओत दिसून येते. यासाठी तिला स्वतःलाही पावसात भिजावे लागत आहे. पण पाऊस थांबेपर्यंत ती हार मानत नाही. मातेच्या प्रेमाचे हे आदर्शवत उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी क्यक्त केली आहे. वास्तविक मोठय़ा पावसात मोठय़ा कोंबडय़ांच्या जीवालाही धोका असतो. पण येथे अपत्यांचा जीव वाचविण्याचा प्रश्न असल्यामुळे ही कोंबडी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे प्रयत्न करीत आहे, ते पाहून अनेकांनी विविध कौतुकभऱया शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.