Tarun Bharat

Kolhapur : महे येथे ट्रॅक्टर ट्रॉली व दुचाकीची धडक होऊन लहान मुलाचा जागीच मृत्यू

कसबा बीड प्रतिनिधी

महे (ता.करवीर) येथे ट्रॅक्टर ट्रॉली व दुचाकीची धडक होऊन एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. विधित दिपक पाटील (वय १३ महिने), रा. वाकरे असे त्या लहान मुलांचे नाव असून आई दिक्षा दिपक पाटील व मुलाचे आजोबा शिवाजी पाटील (रा.अर्जुनवाडा, ता.राधानगरी) हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास देवरे अर्जुनवाडा (ता.राधानगरी) येथे माहेरी मुलांसह गेल्या होत्या. आज त्या आपल्या वडिलांना घेवून वाकरे येथे चालल्या होत्या. महे येथील कमानी जवळ रस्ता ओलांडताना समोरून आलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी दोन्ही ट्रॉलीच्या मध्ये जाऊन धडकली. यामध्ये आईच्या कडेवर असलेल्या देवरे यांचे डोकं डांबरी रस्त्यावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर आई व आजोबा हे १५ ते २० फूट फरफटत गेले. नशीब बलवत्तर म्हणून हे दोघे वाचले. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली आहे.

Related Stories

जिल्ह्यातील भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्या

Archana Banage

…तर दोन्ही मंत्र्यांना पाच नद्यांच्या पाण्याने अंघोळ

Archana Banage

पाचगावात खा. महाडिक गट विरुद्ध आ. सतेज पाटील गटात चुरस

Abhijeet Khandekar

शासननिर्णयातील शुध्दीपत्रकाने ‘वारणा’ ची धुगधुग कायम

Archana Banage

Kolhapur : जिल्हय़ातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे 15 सप्टेबरनंतर बिगुल

Abhijeet Khandekar

कोल्हापूर :`म्युकर’च्या ५० टक्के रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Archana Banage