बेळगाव प्रतिनिधी- पतंगाचा मांजा गळय़ात अडकून एका बालकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी गांधीनगरजवळ हि घटना घडली आहे.
वर्धन (वय 6) रा. हत्तरगी या त्या दुर्दैवी बालकाचे नाव असून आपल्या वडिलांसमवेत मोटारसायकलवरून जाताना पतंगाचा मांजा गळय़ात अडकून त्याचा गळा चिरला गेला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. थोडय़ा वेळात त्याचा मृत्यू झाला आहे. माळमारुती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Previous ArticleDiwali Festival : या दिवाळीत उटणे लावा पारंपरिक पद्धतीने
Next Article कृष्णा नदीमध्ये सोडले मळी मिश्रीत पाणी