Tarun Bharat

मंदिरात अर्पण करतात घडय़ाळ

मध्यप्रदेशच्या रतलाम येथील अनोखे मंदिर

देशाचे हृदय म्हणवून घेणाऱया मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्य़ात एक असे मंदिरे आहे, जेथे लोक घडय़ाळ अर्पण करतात. सगस बावजी मंदिर शतकांपेक्षा जुने आहे. येथे दर्शन घेतल्यावर कुठल्याही प्रकारच्या दुर्घटनेपासून वाचता येत असल्याची श्रद्धा आहे. सर्वात विशेष म्हणजे या मंदिरात देवाची मूर्ती अन् पुजारी देखील नाही, तरीही हजारो लोकांची श्रद्धा कायम आहे.

सगस बावजीला शास्त्रांमध्ये यक्ष म्हटले गेले आहे, या मंदिरात यत्र साकार रुपात दिसू लागतो अशी मान्यता आहे. अनेक वाट चुकलेल्या लोकांना यक्ष योग्य मार्गावर पोहोचवित असल्याची आख्यायिका आहे. लोक येथे येऊन नवस करतात आणि तो पूर्ण झाल्यावर घडय़ाळ अर्पण करतात. हे पूर्ण मंदिर घडय़ाळांनी भरून गेलेले आहे. येथे दरवर्षी अर्पण करण्यात आलेली घडय़ाळे नदीत वाहिली जातात. येथे दरवर्षी हजारो घडय़ाळे मंदिरात जमा होत असतात.

या मंदिराला कधीच कुलूप लावले जात नाही. कुणा व्यक्तीने पाच घडय़ाळे चोरण्याचा प्रयत्न केल्यावर तो आंधळा झाला. मंदिरात 10 घडय़ाळे अर्पण केल्याला त्याला दृष्टी परत मिळाल्याची आख्यायिका येथे आहे.  या मंदिराजवळून एक महामार्ग गेला आहे, या महामार्गावर प्रवास करणारे लोक येथे थांबून मंदिरात दर्शन घेत असतात.

Related Stories

काश्मीरमध्ये कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार योजनेचा प्रारंभ

Patil_p

कुपवाडात चकमक; अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद

datta jadhav

सावधान, समूह संसर्गाचा धोका वाढला!

Patil_p

चारधाम यात्रेवरील बंदी उठवली

datta jadhav