Tarun Bharat

पहाडावर चढणारी बंद कार

Advertisements

ही घटना राजस्थानातील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील भोपालगड या किल्ल्याच्या परिसरात असे घडताना अनेकांनी पाहिल्याचा दावा करण्यात येत आहे. 3 ऑगस्ट या दिवशी या परिसरात राहणारे विजयकुमार हे आपल्या मित्रांसह कारमधून किल्ला पाहण्यासाठी निघाले होते. एका विशिष्ट ठिकाणी त्यांनी कार थांबविली आणि मित्रांसह कारमधून उतरून सेल्फी घेऊ लागले. त्याचवेळी अचानकपणे त्यांची बंद केलेली कार आपोआप किल्ल्याची चढण चढू लागल्याचे त्यांना दिसले. प्रारंभी ते अत्यंत घाबरून गेले. त्यांनी कारचा दरवाजा उघडून हँडब्रेक लावला आणि कार रोखली. या घटनेवर त्यांचा विश्वासच बसला नाही.

या रस्त्यावर असे अनेकदा होते, असे नंतर त्यांना सांगण्यात आले. लडाख येथे एक चुंबकीय असल्याचे बोलले जाते. तशाच प्रकारच्या घटना या परिसरातही घडतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे. येथे बंद कार किंवा कोणतेही चारचाकी वाहन आपोआप रस्त्याची चढण चढू लागते. याचे नेमके कारण काय, हे कळत नाही. पण हा प्रकार अनेकांनी अनुभवल्याचेही सांगितले जाते.

काही उत्साही लोकांनी यातील सत्य जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. एका विशिष्ट जागी कार बंद केल्यास ती आपोआप चढावर जाऊ लागते, असा अनुभव या सत्य तपासणाऱयांनाही आला. या विशिष्ट ठिकाणी रस्त्यावर पाणी ओतल्यास ते पाणीही वरच्या दिशेने वाहू लागते, असे दिसून आले आहे. मात्र, हा चमत्कार नसून त्याचे वैज्ञानिक कारण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. असे घडण्यामध्ये कुठलाही चुंबकीय किंवा गुरुत्वार्कषणीय परिणाम नाही. या रस्त्यावर चुंबकीय आणि गुरुत्वार्कषणीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, काहीही विपरित आढळलेले नाही. तज्ञांच्या म्हणण्यानुसार हा दृष्टीभ्रमाचा प्रकार आहे. या रस्त्यावर विशिष्ट ठिकाणी अडीच मीटरचा उतार आहे. तथापि, रस्त्याची रचना अशी आहे, की हा उतारही चढ असल्यासारखे दृष्टीला भासते. परिणामी येथे थांबविलेले वाहन नैसर्गिकरीत्याच उतारावर धावू लागते. मात्र, ते चढावावर जात असल्याचा भास होतो, असा रहस्यभेद करण्यात आला आहे. पण अनेकांचा यावरही विश्वास नाही. त्यामुळे हे गूढ अद्यापही वाहनधारकांना येथे जाण्यासाठी आकर्षित करीत आहे.

Related Stories

बंदी असूनही दिल्लीत जोरदार फटाकेबाजी

Patil_p

दिल्लीतील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद : केजरीवाल सरकारचा निर्णय

Rohan_P

उपचारासाठी सिंगापूरला जाणार लालूप्रसाद यादव

Patil_p

युद्ध-दंगलीचे सनसनाटी कव्हरेज टाळा!

Patil_p

लाच दिल्याशिवाय कामच होत नाही!

Patil_p

टोळधाडीचा सामना करण्यास कर्नाटक सरकार सज्ज

Rohan_P
error: Content is protected !!