Tarun Bharat

उत्पन्न वाढीसाठी व्यापारी संकुल उभारणार

कॅन्टोन्मेंट बैठकीच्या अजेंडय़ावर तीन व्यापारी संकुलांचा प्रस्ताव

प्रतिनिधी /बेळगाव

कॅन्टोन्मेंटला शासनाकडून मिळणाऱया अनुदानात कपात करण्यात आल्याने पाणी बिल व वीज बिल थकले आहे. त्यामुळे महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलांच्या इमारतींचे बांधकाम करून भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटने तयार केला आहे. मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी असलेल्या जागेत बहुमजली पार्किंगतळ उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 28 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अजेंडय़ावर बहुमजली पार्किंगतळ उभारणीचा प्रस्ताव घेण्यात आला आहे. तसेच कॅन्टोन्मेंट कार्यालयाशेजारी असलेल्या व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱया मजल्याचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच किल्ला मार्केटसमोर असलेल्या गाळय़ांच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करून भाडेतत्त्वावर देण्याचा विचार आहे. त्याकरिता सदर प्रस्तावाच्या मंजुरीसाठी हे विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आले आहेत.

कॅन्टोन्मेंटला केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळत होता. मात्र केंद्र शासनाकडून मागील चार वर्षांत निधी मंजूर करण्यात आला नाही. राज्य शासनाकडूनही अनुदान देण्यात आले नव्हते. त्यामुळे पथदिपांच्या विद्युत बिलाची रक्कम आणि पाणीपट्टीची रक्कम थकली आहे. ही बाब केंद्र आणि राज्य शासनाच्या निदर्शनास आणून निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. परिणामी राज्य शासनाकडून एसएफसी अनुदानांतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे.

मात्र, कॅन्टोन्मेंट परिसरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि विकासकामे राबविण्यासाठी मिळणारे अनुदान अपुरे पडत आहे. त्यामुळे महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी संकुलांची उभारणी करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डने तयार केला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तसेच शासनाच्या अनुदानातून बहुमजली व्यापारी संकुलांची उभारणी करण्यात येणार असल्याने याबाबतची चर्चा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत केली जाणार आहे.

Related Stories

एपीएमसी भाजी मार्केटमधील दुकानदार आक्रमक

Omkar B

पहिल्याच दिवशी जोधपूर विमान फुल्ल!

Amit Kulkarni

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना मोबाईलचे वेड

Amit Kulkarni

शिक्षक, पदवीधरांना चिंतनाची गरज

Omkar B

कणबर्गी योजनेचा आराखडा देण्यास टाळाटाळ

Amit Kulkarni

साहाय्यक अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा

Patil_p