नवी दिल्ली : साखर उद्योगाशी संबंधीत असणारी कंपनी द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड साखर आणि त्याच्याशी संबंधीत असणाऱया उत्पादनांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या व्यवसायांच्या उलाढालीमुळे कंपनीचे समभाग गुरुवारी 104.30 रुपयावर व्यवहार करत होते. अशा पद्धतीने या समभागाने दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. कंपनीचा निव्वळ महसूल वार्षिक आधारावर 6.79 टक्क्यांनी वाढून 540.11 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इथेनॉल आणि औद्योगिक अल्कोहोल उत्पादनात कंपनीची मजबूत स्थिती राहिली आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीत साखर, पांढरी क्रिस्टल साखर, इथेनॉल, कॅप्टिव्ह पॉवर आणि मोलॅसिस यांचा समावेश आहे. गुरुवारच्या सत्रात कंपनीचा समभाग 99.40 रुपयावर खुला झाला होता.
Previous Articleन्यूझीलंड वनडे संघांची घोषणा
Next Article ‘अशी धडकली कार डिव्हायडरला’… ऋषभ पंतनेच सांगितले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.