सेन्सेक्स 481 अंकांनी मजबूत : एलआयसी हाऊसिंग 8 टक्क्यांनी मजबुतीमध्ये
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सलगपणे सुरु असलेली घसरण अखेर थांबली आहे. याच दरम्यान बीएसई सेन्सेक्स 481 अंकांनी वधारुन तर एनएसई निर्देशांक 135अंकांच्या तेजीसोबत बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये शुक्रवारी एलआयसी हाऊसिंगचे समभाग हे तब्बल 8 टक्क्यांनी वधारल्याचा लाभ हा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले.
भारतीय बाजारातील कामगिरीनंतर अंतिम सत्रात शुक्रवारी मात्र दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 480.57 अंकांच्या तेजीसोबत 0.74 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 65,721.25 वर बंद झाला आहे. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135.35 अंकांनी वधारुन 0.7 टक्क्यांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 19,517.00 वर बंद झाला आहे.
निफ्टीमध्ये सिप्लाचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.35 टक्क्यांनी आणि इंडसइंड बँकेचे समभाग 3.01 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. तसेच स्टेट बँक, बजाज ऑटो आणि बीपीसीएलचे समभाग हे दोन-दोन टक्क्यांनी प्रभावीत झाले होते.
या क्षेत्रात मजबूत स्थिती
प्रमुख क्षेत्रांमध्ये बँक, कॅपिटल गुड्स आणि धातू यांचे निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच औषध आणि आयटी क्षेत्राचे निर्देशांक 1-1 टक्क्यांनी तेजीत राहिले. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.6 ते 0.6 टक्क्यांनी वधारले आहेत.
सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचे समभाग हे सर्वाधिक 3.25 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. तसेच टेक महिंद्रा, विप्रो आणि भारती एअरटेलचे समभाग दोन टक्क्यांनी वधारले आहेत. टेक महिंद्रा, विप्रो आणि भारती एअरटेल यांचे समभाग दोन टक्क्यांनी वधारले तर एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग 1 टक्क्यांनी तेजीत राहिले. या व्यतिरिक्त इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
घसरणीचा आलेख पाहिल्यास यामध्ये स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक 3 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. यासह एनटीपीसी, मारुती सुझुकी, टाटा मोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग घसरणीत राहिले.
रुपया नुकसानीत
शुक्रवारच्या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणीत राहिला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी प्रभावीत होत 82.84 वर बंद झाला आहे.