Tarun Bharat

कांदाटी खोऱ्याचा सर्वांगीण विकास होणार : विनय गौडा जीसी

दरे तांबसह परिसराची केली पाहणी

सातारा, दिनांक 22: कांदाटी खोऱ्याचा संपूर्ण विकास केला जाणार असून हा संपूर्ण विकास आराखडा तयार करण्याचे नियोजन सर्व पातळ्यांवर केले जात आहे. यामध्ये स्थानिक उपजीविकेला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले. त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब तसेच तापोळा येथे भेट दिली आणि विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

दरे तांब आणि तापोळा परिसरातील शिक्षण, एकात्मिक बालविकास विभाग अर्थात अंगणवाडी, तसेच आरोग्य विभाग इत्यादी विभागांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता अभय पेशवे, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गाढवली ते उत्तरेश्वर मंदिर रस्ता अशी त्यांनी पाहणी केली. तसेच उत्तरेश्वर मंदिर ते हेलीपॅड पासून गणपती घाट( दरे) रस्त्याची पाहणी केली.

दरे मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची देखील त्यांनी पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या नियोजित कामांचा आणि झालेल्या कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून दरे येथील जननी माता मंदिर येथे त्यांनी आढावा घेतला. दरे तर्फ तांब, तापोळा, उत्तरेश्वर रस्ता येथे त्यांनी भेट दिली. या परिसरातील शिक्षण, एकात्मिक बालविकास विभाग तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्या बैठकीत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच कांदाटी खोऱ्याचा संपूर्ण विकास आराखडा तयार करण्याच्या नियोजनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.” या खोऱ्याचा संपूर्ण विकास होण्यासाठी सर्व विभागांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. तसेच; समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रशासनाचे लाभ सर्व योजना पूर्ण क्षमतेने पोहेचाव्यात. या दृष्टीने सर्व अधिकारी कर्मचारी आणि एकंदर यंत्रणा यांनी आराखडा तयार करावा.

हे ही वाचा : काही लोकांना सत्तेशिवाय जमत नाही

आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी असे सर्वच विभाग विकासाचे महत्त्वाचे भाग असून सर्वार्थाने ग्रामीण जनतेला या सर्व विभागांच्या सर्व सेवा सुविधा, लाभ आणि योजनांचा फायदा व्हावा. या दृष्टीने आराखड्याची मांडणी करावी तसेच सर्व विभागांनी आराखडा यशस्वी होण्यासाठी आंतरिक समन्वय उत्कृष्ट राखावा अशा सूचना गौडा यांनी दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी स्वागत केले.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरु

Archana Banage

मराठा नेत्यांची बैठक घेणार

Patil_p

शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्यासाठी कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठीतून देण्याची गरज – राज्यपाल

Archana Banage

लक्ष्मी टेकडीवरील घरकुलाचे काम अर्धवट

datta jadhav

दिवडमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन

datta jadhav

अवैध अर्ज झाला वैध

Patil_p
error: Content is protected !!