शिवसेनेच्या नेत्या (शिंदे गट) शितल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. या व्हायरल व्हिडीयोनंतर शितल म्हात्रे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून हा व्हिडीयो ठाकरे गटातील नेत्यांनी मॉर्फ करून सोशल मीडीयावर व्हाय़रल केल्याचा आरोप केला आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर काही दिवसांनी शिंदे गटात सामिल झालेल्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी काल दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारी मध्ये त्यांनी ठाकरे गटाने त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी एक मॉर्फ केलेला व्हीडीयो सोशल मीडीयावर व्हायरल केला आसल्याचा दावा केला आहे.
मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आशीर्वाद यात्रा काल संपन्न झाली. श्रीकृष्णनगर येथून अशोकवन जंक्शन, दहिसर पूर्व ते मुंबईपर्यंत काढण्यात आलेल्या या यात्रेदरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार प्रकाश सुर्वे, महिला नेत्या शीतल म्हात्रे यांचाही सहाभाग होता. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांची काही दृश्य सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहेत.