घरदार विकले, चांगली नोकरी सोडून भ्रमंती
जगात अनेक प्रकारचे लोक असतात आणि जीवनाबद्दल त्यांचा विचार अन् प्राथमिकता असते. काही लोक स्वतःचे जीवन एका ठिकाणी निवांतपणे घालवावे या विचाराचे असतात. तर काही लोकांना मात्र जीवनात वेगवेगळय़ा ठिकाणी हिंडण्याचा छंद असतो. अशा लोकांना एकाच ठिकाणी राहणे आवडत नाही. अशाच एका जोडप्याने स्वतःचे निवांत जीवन त्यागून भटंकतीचा मार्ग निवडला आहे.
ऑक्सफोर्ड येथे राहणारे ब्रिटिश जोडपे केरन अन् एलिस यांनी स्वतःचे दोन बेडरुमचे घर विकले. जोडप्याने चांगली नोकरी सोडून विविध ठिकाणी भटकत राहण्याचे जीवन निवडले आहे. आता एका व्हॅनमधून एका देशातून दुसऱया देशात प्रवास करत असतात. स्वतःच्या या निर्णयाबद्दल त्यांना अभिमानच आहे हे विशेष.
पेशाने आयटी सल्लागार केरन आणि त्यांची अकौंटंट पत्नी एलिस यांनी 9-5 या वेळेतील नोकरीला रामराम ठोकून स्वतःसाठी एक ऍडव्हेंचरस जीवन निवडले आहे. ते जगभरात पोहणे, सर्फिंग अन् हायकिंग करत स्वतःचे जीवन जगत आहेत. त्यांनी स्वतःचे घर विकून सुमारे 6.5 लाख रुपयांमध्ये एक व्हॅन खरेदी केली आणि त्याला छोटय़ा घरात रुपांतरित केले आहे. त्यांच्या या घरात डबल बेड, एक चौरसमीटरचे किचन, आउटडोअर शॉवर अन् टॉयलेट देखील आहे. हा टॉयलेट कॉम्पोस्टिंग टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.
या जोडप्याने ऑगस्ट 2020 मध्ये उत्तर फ्रान्समधून स्वतःचा प्रवास सुरू केला होता. 2 वर्षांमध्ये त्यांनी 25 हजार मैलाचे अंतर कापले आहे. तसेच 16 युरोपीय देशांची सैर केली आहे. अशाप्रकारचे जीवन काहीही करण्याचे स्वातंत्र्य देते. व्हॅनमध्ये वीजेसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात आले असून किचनमध्ये कॉफी मशीन, फ्रिज, एअर फ्रायर अन् गॅस हॉब्ससोबत एक सामान्य जीवन जगत आहोत असे असे एलिस यांचे म्हणणे आहे. या जोडप्योन युटय़ूबवर एक चॅनल सुरू करत त्यावर ते स्वतःच्या व्हॅन लाइफची माहिती वेळोवेळी देत असतात.