Tarun Bharat

कणकवलीत सिलिंडरने घेतला पेट

Advertisements

A cylinder caught fire in Kankavli

संपलेल्या सिलिंडरच्या जागी भरलेला सिलिंडर लावत असतानाच नॉब उघडल्यानंतर अचानक आगीच्या संपर्कात आलेल्या सिलिंडरने अचानक पेट घेतला. कणकवली शहरातील जळकेवाडी येथील कृष्णा चव्हाण यांच्या घरी गुरुवारी सकाळी ८.३० वा. सुमारास झालेल्या या घटनेनंतर कृष्णा यांचा मुलगा राजू चव्हाण यांनी सतर्कता दाखवत पेटलेला सिलिंडर किचनरूमच्या बाहेरील पडवीत ढकलला. तेथे सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांनी पडवीतील कौलेही उडाली आणि वाशांनीही पेट घेतला. तेथील वाॅशिंग मशिन, पाण्याची टाकी जळून नुकसान झाले. अगदी नजीकच्या झाडांच्या पानांनाही आगीची झळ बसली होती. घटना समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मिळेल त्या साधनांचा वापर करत आग आटोक्यात आणली.

कणकवली / वार्ताहर

Related Stories

आंगणेवाडीच्या सर्व सीमा करणार सील

NIKHIL_N

वीजबील दुरुस्ती नाही, तर बील भरणार नाही

Abhijeet Khandekar

वेंगुर्लेच्या क्रॉफर्ड मार्केटचा लोकार्पण सोहळा संपन्न

Tousif Mujawar

पेट्रोल – डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीपार

Tousif Mujawar

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी 18 केनियन महिला ताब्यात

datta jadhav

गलवान खोऱ्यात मारले गेलेल्या सैन्यांची चीनकडून कबुली

datta jadhav
error: Content is protected !!