Tarun Bharat

Satara : रेल्वे स्टेशन जवळ सापडला एका इसमाचा मृतदेह

हात व पाय नसल्याने घातपातीचा संशय

Advertisements

सातारा : शहरातील रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या मार्गावर क्षेत्र माऊलीच्या चौकामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्यास हात व पाय नसल्याने हा प्रकार घातपताचा आहे की त्याचे अवयव कोण्या हिंस्त्र प्राण्यानी खाल्ले आहे याबद्दल सातारा पोलीस तपास करत आहेत.

साताऱ्यातील मुख्य रेल्वे स्टेशन असलेल्या रोडवर एका व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना काही नागरिकांकडून सांगण्यात आली होती. याबद्दलची माहिती मिळताच सातारा शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदरचा व्यक्ती हा सातारा तालुक्यातील सोनगाव येथील गावचा रहिवासी असल्याचे देखील प्राथमिक तपासामध्ये उघड झाले आहे. तर त्यांच्या नातेवाईकांनी देखील त्याची ओळख पटवली आहे. सातारा शहर पोलीस या घटनेचा पंचनामा करत असून हा प्रकार कशामुळे घडला आहे याचा त्यांनी कसून तपास सुरू केला आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील कोरानामुक्त 1003 नागरिकांना डिस्चार्ज

Archana Banage

विनाकारण फिरणाऱया वाहनांवर कारवाईचा धडका

Patil_p

पालिका लावणार शहरात अडीच हजार झाडे

Patil_p

सातारा : विनामास्क विरोधात बोरगाव पोलिसांची धडक मोहीम

Archana Banage

सातारा : लग्न समारंभासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित आदेश जारी

datta jadhav

सातारा : स्वयंशिस्त की अशंतः लॉकडाऊन

Archana Banage
error: Content is protected !!