प्रतिनिधी /काणकोण
देवबाग, कारवार येथील समुद्रकिनाऱयावर अंदाजे 8 फूट लांबीचा मृतावस्थेतील एक डॉल्फिन मासा आढळला असून त्याची चिकित्सा करण्यात आल्यानंतर त्याच्या पोटात नायलॉनचे तुकडे आढळले आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱयांनी दिली. यासंबंधीचे वृत्त मिळाल्यानंतर स्थानिक वनाधिकारी त्याचप्रमाणे नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱयांनी पंचनामा करून सदर मृत डॉल्फिनची विल्हेवाट लावली.