Tarun Bharat

मायनिंग विरोधात एकजुटीचा निर्धार

Advertisements

A determination to unite against mining

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड तर वेंगुर्ला तालुक्यातील साेन्सुरे, आरवली, सखैलखाेल, बांध या गावात जेएसडब्ल्यू कंपनीने मायनिंग करण्यासाठी मायनिंग पूर्वसर्वेक्षण करण्याचे ठरवले आहेत. त्यासाठी या ग्रामपंचायतीकडून सर्वेक्षण करण्यासाठी ‘ना हरकत दाखला’ मागितला आहे. त्यासाठी कंपनीने या ग्रामपंचायतींना पत्र दिले होते. सोन्सुरे ग्रामपंचायतीने बोलावलेल्या ग्रामसभेत मायनिंग सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखला न देण्याचा ठराव दोन दिवसांपूर्वी केला होता. तसाच ठराव आजगाव- धाकोरे ग्रामपंचायतीने शुक्रवारी बोलावलेल्या ग्रामसभेत एकमताने करण्यात आला. ग्रामसभेला ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे हजेरी लावली होती.


दोन्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला ग्रामस्थाने उस्फूर्तपणे हजेरी लावत सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखला कंपनीला न देण्याचा ठराव करताना या दोन्ही गावांमध्ये कंपनीला कोणत्याही परिस्थितीत मायनिंग करू दिले जाणार नसल्याचा निर्धारही करण्यात आला.ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत जेएसडब्ल्यू कंपनीला सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखला देऊ नये असे ग्रामस्थानी एक मताने ग्रामसभेत सांगितले. याबाबतचा ठराव केशव गाेगटे यांनी मांडला. त्याला अनंत दिनकर पांढरे यांनी अनुमोदन दिले. सरपंच सुप्रिया वाडकर यांनी ‘मायनिंग प्रकल्प हानिकारक आहे, यामुळे बागायती नष्ट होण्याबरोबर परिसरातील पाण्याचे स्रोत नष्ट होणार आहेत. लोकांच्या उपजीविकेचे साधनच मायनिंगमुळे हिरावुन घेतले जाणार आहे. रेडीतील मायनिंगची परिस्थिती सर्वांसमोर आहे. ही परिस्थिती पाहता कंपनीला सर्वेक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला दिला जाणार नाही. तसेच कंपनीने भविष्यात मायनिंग करण्याचे ठरवल्यास त्याला ठामपणे विरोध केला जाईल’ असे स्पष्ट केले.
प्रकल्पाच्या बाजूने बोलण्यास कुणीही पुढे आले नाही. प्रकल्पाला ग्रामसभेने एकमताने विरोध केला. या संदर्भात संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या संघर्ष समितीच्या माध्यमातून मायनिंगला विरोध करण्यात येणार आहे.

व्यासपीठावर सरपंच सुप्रिया वाडकर, उपसरपंच हेमांगी तेली, ग्रामपंचायत सदस्य शंकर गोवेकर, अंकिता वाडकर, प्रेरणा पांढरे, साधना कळसुलकर, गजानन काकतकर, बाळकृष्ण हळदणकर, ग्रामसेवक एस् आर. गवस, गोविंद भगत, एस वि आजगावकर, एस एन आरोंदेकर, जगन्नाथ काळाेजी,पोलीस पाटील निकिता पोखरे तर ग्रामसभेला प्रसाद झांटये, विलासनंद मठकर, सुशीला आजगावकर, अबी पराब, विश्वजीत शेटकर, सुनील वाडकर, गुरुदत्त नातू, प्रवीण मुळीक, आनंद पांढरे, श्याम बेहरे,एकनाथ शेटकर, चंद्रकांत पांढरे वासुदेव शिंदे, प्रवीण मुळीक, हरेश झांटय़े, गजा पांढरे आदीसह साडेतीनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांचाआजचा पवित्रा पाहता आजगावात मायनिंगला जोरदार विरोध असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Related Stories

‘क्वारंटाईन’ प्रक्रियेबाबत पालिका अंधारात

NIKHIL_N

विद्युतीकरणानंतर कोकण रेल्वेचे कोटय़वधी रुपये वाचणार

NIKHIL_N

स्मृतिदिनी टिळक जन्मभूमीची कवाडे कुलुप बंद

Patil_p

उदय सामंतांच्या बैठकीवर बचाव समिती, व्यापाऱयांचा बहिष्कार

Patil_p

मोर्ले गावात पुन्हा आला टस्कर

NIKHIL_N

जिल्हय़ात बँक कर्मचारी आजपासून संपावर

Patil_p
error: Content is protected !!