जॉर्जियामध्ये मुलांसोबत प्रौढांनाही करतो मदत
जॉर्जियामध्ये एक भटका श्वान इन्स्टाग्रामवर अत्यंत चर्चेत आहे. याचे नाव ‘कुपता’ आहे. हा श्वान लोकांना रस्ता ओलांडण्यास मदत करतो. कुपता बटुमी शहरात राहतो, इन्स्टाग्रामवर त्याचे 37,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या अकौंटवर नियमितपणे मनाला स्पर्श करणारे व्हिडिओ पोस्ट केल्या जातात.
कुपताच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये क्रॉसिंग गार्ड, लोकांची पसंत आणि जॉर्जियाची शान असे लिहिलेले आहे. परंतु त्याचे अकौंट कोण हाताळतो, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुपताचे एक वॉल पेंटिंग देखील तयार करण्यात आले असून यात तो जॉर्जियाचा ध्वज पकडून असल्याचे दिसून येते.
कुपताचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यात तो लोकांना रस्ता ओलांडण्यास मदत करताना दिसून येतो. लोक रस्ता ओलांडून जात नाही तोवर तो झेब्रा क्रॉसिंगवर ये-जा कर असल्याचे दिसून येते. यादरम्यान एखादी कार नजीक आल्यास तो भुंकू लागत होता. या व्हिडिओला 16 हजारांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.
लोकांकडून कौतुक
या व्हिडिओवर लोक अनेक प्रकारच्या टिप्पणी करत आहेत. अनेकांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. पूर्ण शहर त्याची देखभाल करते, कधीकधी लोकांच्या घरांमध्येही तो जात असल्याचे एका युजरने म्हटले आहे.