व्हायरल झाली चकित करणारी कहाणी
देशविदेशातून अशा अनेक घटना समोर येतात, जेव्हा लोक स्वतःच्या कुटुंबीयांसाठी किडनी देखील दान करतात. परंतु कधीकधी किडनीचा अवैध व्यापार होण्याच्या बातम्याही समोर येत असतात. अलिकडेच महिलेची एक अशी कहाणी समोर आली आहे, जी जाणून घेतल्यावर सर्वजण चकित झाले आहेत.


ही घटना ब्रिटनच्या पोर्ट्समाउथमध्ये राहणाऱया 52 वर्षीय एलेन गार्नर नावाच्या एका महिलेशी संबंधित आहे. या महिलेचा मित्र जाफ्रा शमशुद्दीन दीर्घकाळापासून रुग्णालयात उपचार घेत होता. त्याची किडनी निकामी झाल्याचे त्याच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. याची माहिती सर्व नातेवाईकांपर्यंत पोहोचताच या महिलेने किडनी दान करण्याची तयारी दर्शविली आहे.
महिलेने स्वतःच्या नातेवाईकासाठी किडनी दान केली आहे, चांगली बाब म्हणजे संबंधित महिला आणि तिचा नातेवाईक काही दिवसांनी बरे झाले. याचदरम्यान या महिलेकडे अचानक एक गिफ्ट पोहोचली. दरवाजाबाहेर एक बाइक उभी असल्याचे या महिलेला आढळून आले. या बाइकची किंमत 11 लाख रुपयांच्या आसपास होती. ही बाइक हर्ले डेव्हिडसन कंपनीची आहे. या बाइकची किंमत 8.5 लाख रुपये तर अडीच लाख रुपये खर्च करून लक्झरी नंबरप्लेटही त्याने गिफ्ट केली आहे.


ही बाइक त्याच व्यक्तीने गिफ्ट केली आहे, ज्याच्यासाठी आपण काही काळापूर्वी किडनी दान केली होती असे महिलेला कळले. विशेष म्हणजे ही बाइक खरेदी करण्याचे स्वप्न या महिलेने दीर्घकाळापासून बाळगले होते, परंतु पुरेशा पैशांअभावी तिला स्वतःचे स्वप्न पूर्ण करता आले नव्हते.
एलेन स्वतःच्या विकल्या गेलेल्या हार्ले डेव्हिडसन बाइकची खूप आठवण काढायची हे मला माहिती होते. याचमुळे मी तिला ही बाइक मिळवून देऊ इच्छित होतो. बाइक मिळाल्यावर एलेन भावुक झाल्याचे 57 वर्षीय जाफ्राने म्हटले आहे.