चिरे कोसळून चार कामगार जखमी, दोघेजण उपचारासाठी गोमेकॉत दाखल
प्रतिनिधी /पणजी
सांतइनेज येथे सुरू असलेल्या स्मार्टसिटी कामाचा एक भाग म्हणून रस्त्यावर खोदलेल्या ख•dयात चिरे घेऊन जाणारा ट्रक कलंडून अपघात झाला. यावेळी ट्रकमधील चिरे कोसळून या ठिकाणी काम करत असलेले चार कामगार जखमी झाले. यापैकी दोन कामगार गंभीर जखमी असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना गोमेकॉत दाखल केले आहे. ही घटना सोमवारी 6 रोजी दुपारी घडली. पणजी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या कामगारांमध्ये अनिऊद्ध शुक्ला, नितीन यादव, विक्राम यादव व बाळू यादव चारहीजण उत्तर प्रदेश, आग्रा येथील आहेत. ट्रकमधून डिझेल गळती लागल्याने अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. ट्रक कोसळताच तेथील लोकांनी मदतकार्य करून चिऱ्यांखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. घटनास्थळी सुरू असलेले काम हे स्मार्ट सिटी अंतर्गत मलनिस्सारण आणि रस्ते प्रकल्पाचा एक भाग आहे.
सोमवारी दुपारी जीए- 04- टी 3834 या क्रमांकाचा चिरेवाहू ट्रक सांतइनेज भागातून जात होता. यावेळी स्मार्टसिटीच्या कामांतर्गत या भागातील रस्ते फोडल्याने या रस्त्यावर ख•s तयार झाले आहेत. ख•ा चुकवताना ट्रक तेथील ख•dयात कलंडला. खड्ड्यात काम करणाऱ्या कामगारांवर ट्रकमधी चिरे कोसळून कामगार जखमी झाले.
पणजीतील स्मार्टसिटीच्या कामामुळे आता अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातानंतर लोकांनी स्मार्ट सिटीच्या कामांबाबत संताप व्यक्त केला आहे. मागील काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी अंतगर्त मल:निस्सारण प्रकल्पाच्या कामासाठी पणजीतील जवळपास सवर्च रस्ते खोदलेले आहेत. काम कधी पूर्ण होणार याबाबत प्रशासनाने कुठलेही ठोस उत्तर दिलेले नाही. या कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी ख•s पडल्याने छोटे मोठे अपघात होत असतानाच आता गंभीर अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत.
दरम्यान, ट्रक अपघाताची घटना समजताच पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व पक्षाच्या अन्य नेत्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व घटनेची माहिती जाणून घेतली.