A dumper carrying sawdust met with an accident near Shravan Valley
चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरवरील तीन कामगार गंभीर जखमी
ग्रीटखडी वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर आडवा उभा असल्याने घडला अपघातात
आचरा कणकवली मार्गावरील, श्रावण हनुमान घाटीच्या धोकादायक वळणावर, चिरे वाहतूक करणारा डंपर अपघातग्रस झाला असून त्यात तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कामाची ग्रीट खडी खाली करणारा डंपर चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या वाळणावर कोणतीही सूचना न देता आडवा उभा केलेला होता. अचानक रस्त्यावर आडवा उभा डंपर समोर आल्याने अपघात टाळण्यासाठी चिरे वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने ब्रेक दाबुन डंपर रस्त्याच्या बाजुला नेल्याने डंपर चरीत जावुन घळणीवर आदळून अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने डंपर उभा करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या खडीच्या डंपर चालकावर आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अपघाताची घटना शुक्रवारी घडली. जखमी कामगारांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलवण्यात आले होते.
आचरा प्रतिनिधी