Tarun Bharat

दिल्लीत मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण सापडला

Advertisements

नवी दिल्ली

 दिल्लीत मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. 22 वषीय आफ्रिकन महिलेला संसर्ग झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी शनिवारी सांगितले. सदर महिला गेल्या महिन्यात नायजेरियाला गेली होती. तिला दोन दिवसांपूर्वी लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांच्या अहवालात संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली. दिल्लीतील या पाचव्या रुग्णामुळे देशातील एकूण मंकीपॉक्सबाधितांचा आकडा 10 झाला आहे. देशाच्या राष्ट्रीय राजधानीत संसर्ग झालेल्या त्या दुसऱया महिला आहेत. सध्या दिल्लीत मंकीपॉक्सची लागण झालेल्या दोन महिलांसह चार जणांवर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Related Stories

आयआरसीटीसीची नवी वेबसाईट, मिनिटाला 10 हजार तिकिटांचे बुकिंग शक्य

Rohan_P

प्रीमियम रेल्वेत मनोरंजनाची सुविधा

Patil_p

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आजपासून बैठक

Patil_p

सुधारित खाण विधेयक लोकसभेत मंजूर

Patil_p

लसीकरणासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

तामिळनाडूत फटका फॅक्टरीत भीषण स्फोट; 11 ठार; 36 जखमी

datta jadhav
error: Content is protected !!