Tarun Bharat

‘लेडी चेटर्लीज लव्हर’वर येतोय चित्रपट

कादंबरीवर अनेक देशांकडून बंदी

सुमारे 94 वर्षांपूर्वी इंग्रजी लेखक डी.एच. लॉरेन्स यांची ‘लेडी चेटर्लीज लव्हर’ नावाची कादंबरी प्रकाशित झाली होती. 1928 मध्ये इंग्रजांसह यावर बंदी घातली होती. वसाहतवादी कालखंड संपुष्टात आला तरीही या पुस्तकावर भारतात बंदी आहे. अमेरिका, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान यासारख्या देशांवरही यावर बंदी होती, यावर खटले चालून अखेरीस इंग्लंडसह अन्य देशामंध्ये या पुस्तकावरील बंदी हटली. या कादंबरीवर वेगवेगळय़ा काळात चित्रपट तयार करण्यात आले. आता नेटफ्लिक्सवर या पुस्तकावर आधारित नवा चित्रपट प्रदर्शित होणार असून तो भारतातही पहायला मिळू शकतो.

लेडीज चेटर्लीज लव्हर हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कहाणी इंग्लंडमधील मजूरवर्गातील पुरूष आणि श्रीमंत कुटुंबातील महिलेच्या नात्याला दर्शविणारी आहे. नेटफ्लिक्सच्या चित्रपटात ब्रिटिश अभिनेत्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. एमा कॉरिन आणि जॅक ओ कोनेल चित्रपटात या चित्रपटात दिसून येणार आहेत. लेडीज चेटर्लीज लव्हर या कादंबरीचा हिंदी चित्रपटसृष्टीवरही प्रभाव राहिला आहे. देव आनंदचा यांचा चित्रपट ‘तीन देवियां’ हा डी.एच. लॉरेन्स यांच्या एका साहित्याने प्रेरित होता.

Related Stories

मास्टर’पेक्षा वरचढ ठरला ‘वकील साब’

Patil_p

‘दिल है ग्रे’मध्ये उर्वशी रौतेला; चित्रपटाचे पोस्टर सादर

Patil_p

पुन्हा जमणार कार्तिक अन् साराची जोडी

Patil_p

‘रावणलीला’मधून प्रतीक गांधीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

Patil_p

पुष्पा’ चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार

Patil_p

गायक रॉबिनवर एमिलीचे गंभीर आरोप

Patil_p