Tarun Bharat

मारुती गल्ली इथे दुकानाला आग

Advertisements

बेळगाव प्रतिनिधी – दसरोत्सवात खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत गर्दी झाली आहे. सर्वत्र सणाचे वातावरण असतानाच सोमवारी रात्री मारुती गल्ली येथे तळमजल्यावर एका दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली असून, लाखो रुपयांचे साहित्य आगीत भाग झाले. या घटनेनंतर बाजारपेठेत एकच धावपळ उडाली, आगीचा प्रकार उघडकीस येताच अग्निशामक दलाच्या जवानांना पाचरण करण्यात आले. आग विझविण्यासाठी पाण्याच्या दोन बंबांसह जवान दाखल झाले. खडेबाजार पोलीस ही दाखल झाले. अग्निशमन दलाचे एस. एस. निलगार, व्ही. एस. टक्केकर, आय. वाय.मडीगैर आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. योगानंद स्टेशनरि या दुकानाला आग लागली, बघता बघता शेजारच्या दुकानालाहि आग लागली, स्टेशनरी दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले., असून एक ग्राम सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात ही आगी मुळे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

Related Stories

एनसीसी छात्रही मदतीसाठी पुढे सरसावले

Patil_p

कागवाडला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने विकासकामांना गती मिळणार

Patil_p

म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी आज उपस्थित राहू नये

Patil_p

निसर्गोपचार पद्धत अत्यंत गुणकारी

Amit Kulkarni

भू-संपादनाच्या धास्तीमुळेच आईचा मृत्यू

Amit Kulkarni

श्रावण शुक्रवारनिमित्त मंदिरांमध्ये महिलांची गर्दी

Amit Kulkarni
error: Content is protected !!