60 वर्षांपासून हा प्रकार सुरू
काही जागांचा इतिहास खूपच जुना असतो, परंतु अशा जागा कालौघात मागे पडत जातात. यामागे नैसर्गिक संकट किंवा महामारी तसेच दुर्घटना असू शकते. परंतु काही अशा जागा असतात, ज्यांच्यासोबत नेमके काय घडले हेच कधी समोर येत नाही. अशाच प्रकारचे एक शहर असून तेथे जमिनीखाली कित्येक वर्षांपासून आग पेटत आहे.
अमेरिकेच्या सेंट्रलिया नावाच्या शहराखाली मागील 61 वर्षांपासून आग पेटत आहे. सातत्याने पेटणाऱया आगीमुळे हे ठिकाण आता निर्जन ठरले आहे. येथे कुणीच ये-जा करत नाही. हे ठिकाण पेंलिसवेनिया येथे असून एकेकाळी येथे लोकांची मोठी गर्दी असायची. परंतु या शहराला केवळ येथे जमिनीखाली आग पेटत असल्यानेच लोक ओळखतात.
मायनिंग टाउन
सेंट्रलिया नावाचे हे शहर एकेकाळी मायनिंग टाउन होते. परंतु मे 1962 पर्यंत येथील कामकाज बंद झाले आणि लोकांची ये-जा देखील कमी झाली. कोळशाच्या खाणीमध्ये आग लागली आणि हळूहळू ही आग आतील बाजूने भडकत गेली. या गोष्टीला 60 वर्षे उलटली आहेत तरीही आग जमिनीखालील खाणींमध्ये पेटलेली आहे. या आगीमुळे पुढील काही दशकांपर्यंत लोक हळूहळू स्थलांतर करत राहिले आणि 2020 पर्यंत हे शहर पूर्णपणे रिकामी झाले आहे.
निर्जन शहर
1980 पर्यंत येथून 1 हजार लोकांनी स्थलांतर केले होते. 2020 मध्ये अखेरचे 4 लोक देखील स्थलांतरित झाले. 1980 मध्ये येथे 2700 लोकांचे वास्तव्य होते. अनेकदा येथील आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु हानिकारक वायूंची निर्मिती होत असल्याने हा प्रयत्न सोडून देण्यात आला. या आगीच्या धूरात कार्बन मोनोऑक्साइडचे धोकादायक प्रमाण असल्याचे तपासणीत आढळून आले. परंतु या शहरात अद्याप काही शहरे आणि इमारती दिसून येतात.