दोन तास लोंढा-वास्को रेल्वेमार्ग होता बंद : सुदैवाने जीवितहानी नाही
प्रतिनिधी /बेळगाव
लोंढा-वास्को रेल्वे मार्गावर दूधसागरनजीक दोन ठिकाणी दरड कोसळण्याची घटना सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली. यामुळे दोन तास रेल्वेमार्ग बंद ठेवण्यात आला होता. दगड व माती बाजूला केल्यानंतर निजामुद्दीन-वास्को गोव्याला मार्गस्थ झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही.
सोमवारी रात्री 11.30 वा. सोनाळी ते कुलेम व करंजोळ ते दूधसागर या दरम्यान दोन ठिकाणी दरड कोसळली. यामुळे रेल्वे मार्गावर माती व दगड यांचा खच साचला होता.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या रेस्क्यू टिमने घटनास्थळी पोहोचत माती व दगड बाजूला केले. करंजोळ ते दूधसागर येथील रेल्वे मार्ग रात्री 1.30 वा. खुला करण्यात आला. तर सोनाळी ते कुलेम येथील रेल्वेमार्ग रात्री 2.30 वाजता खुला झाला.
गोवा एक्स्प्रेस बेळगाव येथे थांबविली
हजरत निजामुद्दीन येथून वास्कोच्या दिशेने जाणारी गोवा एक्स्प्रेस सोमवारी मध्यरात्री बेळगाव रेल्वेस्थानकात काहीकाळ थांबविण्यात आली. रस्ता खुला झाल्यानंतर तासाभराने रेल्वे मार्गस्थ झाली. यशवंतपूर-वास्को ही एक्स्प्रेसही काहीकाळ लोंढा रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली होती.
नैर्त्रुत्य रेल्वेकडून उपाययोजना
दरड कोसळू नये यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने योग्य ती उपाययोजना यापूर्वीच केली होती. त्यामुळे यावषी दरड कोसळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दूधसागरनजीक झालेल्या पावसामुळे सोमवारी मध्यरात्री दरड कोसळण्याचे प्रकार घडले. रेल्वे कर्मचाऱयांनी तास ते दीड तासामध्ये माती व दगड काढून रेल्वेमार्ग खुला केल्याचे तरुण भारतशी बोलताना सांगितले.
अनिष हेगडs (जनसंपर्क अधिकारी नैर्त्रुत्य रेल्वे)