Tarun Bharat

कासवाच्या आकारातील तरंगते शहर

Advertisements

लाटांवर असणार हजारो लोकांची घरे

जगात लोक काही ना काही नवे आणि अनोखे करण्यासाठी चढाओढ करत आहेत. कुणीतरी नौकेवरच स्वतःच घर थाटत आहे, तर कुणी चंद्रावर जमिनीचा तुकडा खरेदी करत आहे. अनेक धनाढय़ स्वतःचे खासगी लक्झरी याट खरेदी कर असल्याचे ऐकले असेल. परंतु आता एक इटालियन कंपनी ही संधी हजारो लोकांना देत आहे. याटवर जगण्याचा आनंद या कंपनीकडून उपलब्ध करण्यात येणार आहे.

लाझ्झरिनी डिझाइन स्टुडिओ नावाच्या इटालियन कंपनीच्या डिझायनर्सनी मिळून एक मोठय़ा आणि न बुडणाऱया याटची योजना तयार केली आहे. यावर कुठलेच रेस्टॉरंट किंवा ऍडव्हेंचर पार्क नव्हे तर 60 हजार लोकांसाठी वास्तव्यस्थान असणार आहे. 2033 पर्यंत याची निर्मिती पूर्ण होणार असल्याचा दावा आहे. याटमध्ये राहणाऱया लोकांसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध असतील, कारण हे समुद्रावर तरंगणारे शहर असणार आहे.

या सिटी प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याचा आकार मोठा अन् विशाल कासवाप्रमाणे असणार आहे. लाझ्झारिनी डिझाइन स्टुडिओनुसार 2 हजार फूट रुंद या तंरगत्या शहरात केवळ फ्लॅट्सन नव्हे तर हॉटेल्स, शॉपिंग सेंटर, पार्क, डॉक आणि मिनी एअरपोर्ट देखील असणार आहे. याच्या निर्मितीकरता 8 वर्षांचा कालावधी लागणार आहे. 2033 पर्यंत हे शहर वास्तव्ययोग्य ठरणार आहे. सर्वप्रथम कंपनीला याकरता एक ड्राय डॉक तयार करावा लागणर आहे. कंपनीने याचे व्हर्च्युअल एनएफटी इंट्रन्स तिकिट आणि व्हीआयपी सुइट्सची विक्री सुरू केली आहे.

अब्जावधीचा खर्च येणार

हे तरंगते शहर तयार करण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येणार आहे. ड्राय डॉकसाठी सौदी अरेबियातील ठिकाण निवडले जाणार आहे. या शहराला सौरऊर्जेद्वारे ऊर्जा मिळणार आहे. या प्रकल्पाचे नाव पनेगा असून या टेरायाटमध्ये 60 हजार घरांची विक्री केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

स्मरणशक्ती वाढविणारे हेल्मेट

Amit Kulkarni

उपकरणामुळे पॅडलशिवाय धावते ‘सायकल’

Patil_p

आकाशात झाला फूटबॉल सामना

Patil_p

104 वर्षांपासून एकाच घरात वास्तव्य

Amit Kulkarni

देशात पहिले कोरोना टेस्टिंग किट तयार

datta jadhav

स्मार्टफोनमुळे पालकांची होते चिडचिड

Amit Kulkarni
error: Content is protected !!