बेळगाव : बेळगाव परिसरात डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सर्व स्तरातून विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहेत. आपल्या वॉर्डात डेंग्यू होऊ नये यासाठी नगरसेवकाने आपल्या हातात फॉगिंग मशीन घेऊन वॉर्डातील सर्व परिसरात औषध फवारणी केली. बसवण कुडची परिसरातील वॉर्ड नं. 48 येथे ही औषध फवारणी करण्यात आली असून नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे वार्डातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.स्वत: हातात फॉगिंग मशीन घेऊन संपूर्ण वॉर्ड परिसरातील गल्ल्या, गटार तसेच अस्वच्छ परिसरात औषध फवारणी केली. परशराम बेडका, संजू बडगे आदींसह वार्डातील महिलांनी या नगरसेवकाचे आभार मानले.
Previous Articleउद्यमबाग ब्रह्मनगर येथे मुख्य रस्त्यावर साचले पाणी
Next Article किल्ला तलाव येथे साचलेल्या पाण्यामुळे मुलांची गैरसोय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.