युवतीकडून स्थापना, 200 पेटओनर्सला होतेय मदत
माणूस स्वतःसोबत इतरांबद्दलही विचार करू शकतो आणि प्रसंगी मदतही करू शकतो. काही लोक प्राणीप्रेमी असतात, ते स्वतःसोबत प्राण्यांच्या जगण्याच्या अधिकाराचीही काळजी घेतात. एका मुलीने पाळीव प्राण्यांच्या खाण्यापिण्याच्या गरजेचा विचार करत एक फूड बँक स्थापन केली आहे.
24 वर्षीय टायशा मनकॅस्टर नावाच्या युवतीने पाळीव प्राण्यांसाठी एक फूड बँक निर्माण केली आहे. याच्या माध्यमातून स्वतःच्या पाळीव प्राण्यांचा खर्च उचलू न शकणाऱया लोकांना मदत मिळाणार आहे. काही काळातच या फूड बँकेचा 200 पेट ओनर्सनी लाभ घेतला आहे.
इंग्लंडच्या नॉर्थअंबरलँड येथे राहणारी टायशा मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करते आणि तिला प्राण्यांसाठी फूड बँक स्थापन करण्याची कल्पना एका फेसबुक पोस्टमुळे सुचली होती. तिने काही किटन फूडची पाकिटे स्थानिक कॅट ओनर्सला दिली होती. तिच्याकडेही दोन मांजरं असून जी अडल्ड फूड खाऊ लागली होती अशा स्थितीत तिने उर्वरित खाद्य वाटले होते. टायशाच्या फेसबुक पोस्टवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. ज्यानंतर तिला फूड बँक स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली होती. तिने एशिंग्टनमध्ये ए हेल्पिंग पॉ पेट फूड बँक नावाने उपक्रम सुरू केला आहे. स्वतःच्या पाळीव प्राण्यांचे पोट भरण्यासाठी संघर्ष करणाऱया लोकांसाठी हा उपक्रम लाभदायक ठरला आहे.
केवळ मांजरच नव्हे तर श्वान, सशांचेही खाद्य याद्वारे पुरविण्यात येते. लोक येथे महिन्यातून दोनवेळा येऊ शकतात आणि एकावेळी त्यांना आठवडाभर पुरेल इतकी खाद्यसामग्री देण्यात येते. प्रथम या लोकांना फेसबुक पेजवर मेसेज करून फ्रीड फूड पॅकेज प्राप्त करावे लागते असे टायशाने सांगितले आहे. टायशा छोटय़ाशा टीमसोबत आठवडय़ात 30 लोकांना मदत करते. या कामाकरता ती लोकांना खाद्यसामग्री किंवा पैशांनी मदत करण्याचे आवाहनही करते.