ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने खोपोलीजवळ 6 वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, यात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात काही जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते. सुदैवाने जीवितहानी टळली.
ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अपघातातमुळे एक्स्प्रेस वेवर काही तास वाहतूक ठप्प झाली होती. आता या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
अधिक वाचा : MPSC ची ‘ती’ यादी तात्पुरत्या स्वरुपाची