हेलिपॅड अन् इमारतींसोबत होतेय विक्री
आलिशान जीवन जगण्याची इच्छा जवळपास प्रत्येकाचीच असते. परंतु प्रत्येकाला ते शक्य होईलच असते. परंतु ही इच्छा पूर्ण करणे अवघड देखील नाही, कारण स्कॉटलंडच्या सुंदर भूमीवरील एक बेट एका बंगल्याच्या किमतीत विकले जात आहे.
स्कॉटलंडचे सुंदर बेट प्लाडा एका आलिशान बंगल्यापेक्षाही कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते. पूर्ण बेट 3 लाख 50 हजार युरोंमध्ये म्हणजेच 3.5 कोटी रुपयांपेक्षाही कमी किमतीत विकले जात आहे. बेट खरेदी करून तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार तेथे राहू शकता.
स्कॉटलंडच्या ऐरन किनाऱयावर असलेले प्लाडा बेट विक्रीसाठी उपलब्ध आहे. सद्यकाळात या बेटावर कुणीच राहत नाही, परंतु तेथे स्वतःचे लाइटहाउस (दीपगृह), हेलिपॅड आणि राहण्यासाठी अनेक इमारती आहेत. या ठिकाणी एड्रॉसन येथून कँपबेल्टटाउनपर्यंत फेरीबोटने जाता येते. हे बेट 700 मीटर लांबीचे आणि 33 एकरामध्ये फैलावलेले आहे. पूर्ण बेटच सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. नाइट प्रँकचे इस्टेट एजंट टॉम स्टीवर्ट यांच्यानुसार बेटावर पारंपरिक इमारती निर्माण करण्यात आल्या आहेत. तर 2.5 एकरात फैलावलेले हेलिपॅड देखील आहे. या बेटावर सुमारे 100 प्रजातीचे पक्षी आढळून येतात.
3.36 कोटींमध्ये होतेय विक्री
सद्यकाळात पूर्ण बेटाची किंमत 3 कोटी 36 लाख रुपयांहून काहीशी अधिक आहे. ब्रिटनमध्ये इतक्या रकमेत केवळ फ्लॅटच मिळू शकतो. तर भारतात 3.3 कोटी रुपयांमध्ये एक चांगला बंगला खरेदी करता येतो. हे बेट खरेदी करणाऱयाला येथील जुन्या लाइटहाउस कीपरचे घर देखील मिळणार असून यात 5 बेडरुम, 2 सिटिंग रुम आणि एक बाथरुम आहे. तसेच येथे 2.5 एकरचे उद्यान असून त्याला दगडी भिंतींचे कुंपण आहे. याचबरोबर आणखी एक घर तेथे असून त्यात बेडरुम, शॉवर रुम, किचन आणि सिटिंग रुम उपलब्ध आहे. बेट खरेदीदाराचा लाइटहाउसशी कुठलाच संबंध नसेल. कारण 1990 पासून नॉर्दर्न लाइटहाउस बोर्डाच्या मुख्यालयातून संचालित केले जात आहे.