3 लाख 80 हजार आणि फायबरची बनावट पिस्तुल व तलवार जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
वनविभागाच्या निवृत्त अधिकाऱयाची कार अडवून त्याला पिस्तुल व तलवारीची धाक दाखवून 4 लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास करुन पाचजणांना अटक केली. त्याच्याकडून 3 लाख 80 हजार रुपये रोख आणि फायबरची बनावट पिस्तुल, तलवार, मोठा कोयता जप्त करण्यात आला आहे. हिरेबागेवाडी पोलिसांच्या कारवाईमुळे वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी त्यांचे कौतुक केले आहे.
लगमाप्पा मल्लाप्पा कोळय़ानाईक (वय 30, रा. गटगुद्दी, सध्या रा. शिवाजीनगर, बेळगाव), प्रकाश ऊर्फ पी. के. गुजप्पा गुरव (वय 26, रा. दुर्गम्मा गल्ली, मुत्यानट्टी), कल्लाप्पा सिद्राय होनगी (वय 29, रा. मारुती गल्ली, मुत्यानट्टी), मारुती ऊर्फ हणमंत नागाप्पा बुराणी (वय 20, रा. विठ्ठल गल्ली, मास्तमर्डी), विशाल ऊर्फ पवर सिद्राय तळवार (वय 23, रा. दुर्गम्मा गल्ली, मुत्यानट्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बेळगावहून धारवाडला जाताना हिरेबागेवाडी टोलनाक्मयापासून सुमारे दीड कि.मी. या सर्वांनी निवृत्त वनाधिकाऱयाला धमकावले. त्याच्याकडील 4 लाख रुपये लुटले. याचबरोबर त्याच्या अपहरण देखील केले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांचे खंडणी मागितली होती. या घटनेनंतर एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि. 31 जुलै रोजी रात्री ही घटना घडली आहे. घटनेनंतर 10 ते 15 दिवस उलटले तरी संबंधितांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली नव्हती. निवृत्त वन अधिकाऱयाचा कार चालकच फितूर होता. मुत्यानट्टी परिसरातील गुन्हेगारांना हाताशी धरुन मोठी लुट करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसहांनी सांगितले. या थरारक घटनेनंतर भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन या सर्वांना अटक केली असून स्कॉर्पिओही जप्त केली आहे.
गेली 15 वर्षे बेळगाव येथे वन विभागात सेवा बजावलेला एक अधिकारी निवृत्त झाले आहेत. धारवाडहून रेल्वेने मंडय़ाला जाण्यासाठी 31 जुलै रोजी रात्री ते कारने धारवाडला निघाले होते. ही माहिती त्याच्या कार चालकाने मुत्यानट्टी येथील दरोडेखोरांना आधीच कळविली होती. निवृत्त अधिकारी प्रवास करीत असलेली कार हिरेबागेवाडी टोलनाका ओलांडल्यानंतर चालकाने दरोडेखोरांना सिग्नल दिला. टोलनाक्मयापासून दीड कि.मी. अंतरावर अधिकाऱयाच्यी कार अडविण्यात आली. पिस्तुल तलवारीची धाक दाखवून 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यावेळी या अधिकाऱयाकडे चार लाख रुपये होते. त्यांनी ती रक्कम दरोडेखोरांना दिली. त्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी या पाचजणांना अटक केली.
या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बिरादार, अभिषेक नाडगौडर, ए. के. कांबळे, एम. ए. मटूर, आय. एस. केळगीनमनी, एस. जी. उपारट्टी, एस. सी. चिन्नण्णावर, संतोष जगजंपी आणि तांत्रिक विभागाचे रमेश अक्की यांचा समावेश होता. पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.