छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याचे शानदार अनावरण
संकेश्वर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे रविवारी शानदार अनावरण करण्यात आले. हा दिवस संकेश्वरच्या इतिहासात सोन्याचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केले. ते शिवपुतळा अनावरण समारंभात उद्देशून बोलत होते. कार्यक्रमातून संकेश्वर-करवीर मठाचे सचिदानंद अभिनव विधानृसिंहभारती स्वामीजी, मंजुनाथ भारती स्वामीजी बेंगळूर, सिद्धेश्वर स्वामीजी हत्तरगी व भगवानगिरी महाराज नूल यांचे दिव्य सानिध्य लाभले होते. कत्ती पुढे म्हणाले, शिवरायांनी अखंड हिंदू समाज संरक्षणासाठी निखराची झुंज देत शत्रंtचा नायनाट केला. स्त्रियांना संरक्षण दिले. संकेश्वरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभा करून महान कार्य या ठिकाणी झाले आहे. आगामी दोन महिन्यात बसवेश्वर महाराज, कित्तूर चन्नम्मा राणी, डॉ. आंबेडकर व संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.